नंदुरबार जिल्हा पुन्हा शतप्रतिशत काँग्रेसमय करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:41 PM2018-02-20T12:41:26+5:302018-02-20T12:41:31+5:30
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा उभारी घेत आहे. लवकरच होणा:या लोकसभा, विधान-सभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी नियोजन आणि तयारी सुरू करण्यात आली आहे. मे महिन्यापासून सर्व तालुकास्तरावर बैठकांना सुरुवात होईल. पूर्वीप्रमाणेच नंदुरबार शतप्रतिशत काँग्रेसमय राहील असा विश्वास जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ह्यलोकमतह्णसंवाद उपक्रमात व्यक्त केला.
यावेळी बोलतांना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, भाजपची नुसतीच हवा आहे. गेल्या निवडणुकांमध्ये लाटेवर स्वार होऊन काही जणांना यश मिळाले. परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. काँग्रेसनेही काही प्रमाणात आलेली मरगळ झटकलेली आहे. त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये दिसून आला. चार पालिकांपैकी दोन काँग्रेसच्या ताब्यात आहेत तर एका पालिकेत बहुमत काँग्रेसचे आहे. तळोदा पालिका देखील हातची गेली. काही चुका तेथे झाल्या हे मात्र मान्य करावे लागेल. लगतच्या मध्यप्रदेशातील खेतिया नगरपंचायतीत देखील काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला. जिल्ह्यात त्याआधी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पक्षाने चांगली कामगिरी केली आहे.
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुका या सोबतच होतील अशी शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हाभरात पक्षातर्फे बैठकांचे सत्र सुरू करण्यात येणार आहे. नुकतीच ज्येष्ठ नेते आमदार सुरुपसिंग नाईक यांच्या निवासस्थानी बैठक झाली. येत्या मे महिन्यापासून अर्थात लगअसराई आटोपल्यानंतर सर्व तालुकांमध्ये बैठका घेतल्या जातील. त्या बैठकांना जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. त्यानंतर विभाग आणि ब्लॉक निहाय बैठका होतील. पक्षातील कार्यकत्र्याची निवडणुकांच्या दृष्टीने पुर्णपणे तयारी करवून घेतली जाईल. यावेळी लोकसभेची एक जागा आणि चारही विधानसभेच्या जागा काँग्रेस राखेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भालेर एमआयडीसीबाबत त्यांनी सांगितले, ही एमआयडीसी काँग्रेसच्या कार्यकाळात मंजुर झाली आहे. तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे जावून आपण स्वत: फाईलवर सही करवून घेतली. त्यावेळी विरोधकांनी पुरेपूर विरोध केला. पुर्णपणे शासकीय जागेवर ही एमआयडीसी उभी राहणार असल्यामुळे शेतक:यांचेही नुकसान नाही हे पटवून देण्यात आले. आता लवकरच येथे उद्योगांना प्लॉट उपलब्ध होऊन उद्योग सुरू होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नंदुरबार पालिकेत देखील विकासात कुठलेही राजकारण केले जाणार नाही. विरोधकांनी विकास कामांचे प्रस्ताव दिल्यास शहर आणि नागरिकांच्या दृष्टीने हिताचा असेल तर नक्कीच तो स्विकारला जाईल. परंतु विरोधकांनीही केवळ विरोधाला विरोध न करता विकास कामांना साथ दिली पाहिजे अशी अपेक्षाही आमदार रघुवंशी यांनी व्यक्त केली.