नंदुरबार जि.प.निवडणुकीत उमेदवार उभे करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:41 AM2018-08-23T10:41:57+5:302018-08-23T10:42:05+5:30
राष्ट्रीय समाज पक्ष मेळावा : महादेव जानकर यांचे प्रतिपादन
नंदुरबार : राष्ट्रीय समाजपक्षातर्फे येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काही जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्यासाठी आतापासूनच कार्यकत्र्यानी बुथ पातळीवर प्रमुखांची नेमणूक करण्याच्या सुचना राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यमंत्री महादेव जानकर यांनी दिल्या.
बुधवारी नंदुरबारात रासपचा मेळावा घेण्यात आला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप ढाकणे पाटील, प्रदीप सोनार, सुरेखा वाघ, राजाभाऊ पोथारे, बाळासाहेब दोडतले, सुभाष राजपूत, पुष्पाबाई थोरात, सुनीता वसावे, राहुल कुकरेजा आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी नंदुरबारसह धुळे जिल्ह्यातील पक्ष पदाधिका:यांशी चर्चा केली व पक्ष कार्याचा आढावा घेतला. जानकर यांनी येत्या काळात होणा:या सर्वच निवडणुकांमध्ये पक्ष उमेदवार देणार असल्याचे सांगितले. त्यासाठी जिल्हा, तालुका कार्यकारिणी गठीत करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. महिला आघाडी देखील अधीक सक्षम करण्यासाठी प्रय} करावा. अपंग, युवक, उद्योग आघाडींमध्ये त्या त्या क्षेत्रातील लोकांना जोडावे. सर्वात आधी बुथनिहाय प्रमुख नेमण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. निवडून येऊ शकतील अशा ठिकाणीच उमेदवार देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.