नंदुरबार जिल्ह्यात इंधन दरवाढीचा सर्वाधिक फटका
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: May 22, 2018 12:53 PM2018-05-22T12:53:38+5:302018-05-22T12:53:38+5:30
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम : आठवडाभरात सातत्याने चढउतार
संतोष सूर्यवंशी ।
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 22 : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे संपूर्ण देशात कमी-अधिक प्रमाणात पेट्रोल, डिङोलच्या किमतीत वाढ झाली आह़े परंतु नंदुरबारातील नागरिकांना इंधनवाढीचा सर्वाधिक चटका सहन करावा लागतो़ राज्याचा विचार करताना नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल व डिङोलचे दर सर्वाधिक असल्याची माहिती आह़े
खनिज इंधन उत्पादन करणा:या अरेबियन देशांनी आपल्या कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ केल्यानंतर भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनीसुद्धा पेट्रोल व डिङोलच्या दरात मोठी वाढ केली आह़े
देशात सर्वत्र इंधनाचे दर गगनाला भिडले असले तरी याचा सर्वाधिक फटका नंदुरबारकरांना बसत आह़े सोमवारी नंदुरबारात पेट्रोलचे दर 85 रुपये 52 पैसे तर डिङोलचे दर 73 रुपये 35 पैसे नोंदविण्यात आले आह़े त्यामुळे राज्यात किंबहुना देशातसुद्धा नंदुरबार जिल्ह्यात इंधनाचे दर सर्वाधिक असल्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात आला आह़े
नंदुरबारातील देसाई पेट्रोलपंपावर पेट्रोल 85 रुपये 52 पैसे तर डिङोल 73 रुपये 36 पैसे, पी़जी़ पेट्रोल पंप धुळे रोड येथे पेट्रोल 85 रुपये 48 पैसे तर डिङोल 73 रुपये 31 पैसे तर, भाऊ पेट्रोल पंपावर पेट्रोल 85 रुपये 52 पैसे तर डिङोल 73 रुपये 35 पैसे नोंदविण्यात आले आह़े जळगाव व धुळे जिल्ह्यातसुद्धा साधारणत: पेट्रोल 85 रुपये 34 पैसे तर डिङोल 72 रुपये 3 पैसे इतके नोंदविण्यात आले आह़े खान्देशचा विचार करता, नंदुरबारात इंधनाच्या दराचा सर्वाधिक भडका उडाला असल्याची स्थिती निर्माण झाली आह़े
सेसमुळे वाढत्या दराचा फटका
उड्डानपुलावर सेस लावला जात असल्याने नंदुरबारात साधारणत: रुपया-दीड रुपयाने पेट्रोल व डिङोलच्या किमतीत वाढ होत आह़े 1 जून 2012 रोजी येथील उड्डानपुलाच्या निर्मितीपासून सेस लावण्यात आला होता़
सुरुवातीला चार वर्ष म्हणजे 31 डिसेंबर 2017 र्पयत लावण्यात येणा:या सेसची मुदत पुन्हा दोन वर्षानी वाढवण्यात आली आह़े तसेच व्हॅटच्या दरातही दोन टक्क्यांनी वाढ झाल्याने याचा बोजा सर्वसामान्य नंदुरबारकरांना उचलावा लागत असल्याचे दिसून येत आह़े
पेट्रोल-डिङोलच्या वाढत्या दरांमुळे साहजिकच याचा फटका खासगी आराम बस तसेच एसटी बसेसच्या भाडय़ात जाणवू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही़ ऑईल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींनुसार सोमवारी नवीन इंधन दरवाढ केली़
आठवडाभरात इंधन दरवाढीत वेगवान हालचाली घडत होत्या़ नंदुरबार जिल्ह्यातसुद्धा दोन दिवसात तब्बल दीड रुपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली़
दरम्यान, कच्च्या तेलाचे उत्पादन करणा:या कंपन्यांकडून दरवाढ करण्यात आली असल्याने परिणामी देशातील पेट्रोलियम कंपन्यांनादेखील पेट्रोल-डिङोलच्या दरात वाढ करण्यात आली आह़े परंतु येत्या आठवडय़ात इंधनाचे दर पुन्हा कमी होतील, असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त होत आह़े
सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोलच्या दराचा सर्वाधिक फटका बसत असतो़ दरवाढीमुळे अनेकांचे आर्थिक बजेटसुद्धा कोलमडत असत़े वाढत्या इंधन दरवाढीमुळे साहजिकच दळणवळण व्यवस्थेवर याचा परिणाम जाणवत असतो़
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी होत असल्याने याचाही परिणाम इंधन दरवाढीवर जाणवत असतो़ त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर बलाढय़ देशांची आर्थिक गणिते एकमेकांमध्ये गुंतलेली असतात़़ त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मोठा परिणाम इंधन दरवाढीवर जाणवत असतो़