नंदुरबार जिल्ह्याचे पीक कर्ज उद्दिष्ट 120 कोटी वाटप अवघे 23 कोटी
By admin | Published: June 9, 2017 12:19 PM2017-06-09T12:19:41+5:302017-06-09T12:19:41+5:30
अवघे 19 टक्के पीक कर्ज वाटप : नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक 11 कोटी
Next
संतोष सूर्यवंशी /ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.9 - धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत खरिप हंगामासाठी आतार्पयत केवळ 23 कोटी 12 लाख 21 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल़े यंदाच्या हंगामात नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण 120 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आह़े पैकी, केवळ 19 टक्केच कर्जाचे वाटप आतार्पयत झाले असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धिरज चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़े
यंदा नंदुरबार जिल्ह्यात कर्जाचे वाटप करण्यासाठी बँकेला 120 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होत़े त्यापैकी 23 कोटी 12 लाख 21 हजार रुपयांचे 3 हजार 489 शेतकरी सभासदांना वाटण्यात आले आह़े दरम्यान, मागील हंगामात 19 हजार 944 सभासदांना 99 कोटी 30 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होत़े त्यापैकी 5 हजार 447 सभासदांनी 31 कोटी 23 लाख रुपयांचा भरणा केला असल्याची माहिती चौधरी यांनी दिली़ त्यामुळे अजूनही 14 हजार 498 सभासदांचे 68 कोटी 6 लाख रुपये थकीत आह़े त्यामुळे मागील वसूल करण्यात आलेल्या रकमेतून यंदाच्या हंगामासाठी 23 कोटी 12 लाख रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात आले आह़े त्यामुळे आता उर्वरित कर्जास पात्र ठरत असलेल्या 1 हजार 957 सभासदांनाच आता 10 कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान, 30 जुनर्पयत जी सभासद उर्वरित कर्ज भरतील तेच पुढील कर्जास पात्र ठरणार असल्याचे जिल्हा बँकेकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, गेली अनेक वर्षे शेतकरी एप्रिल-मे महिन्यार्पयत 50 टक्के कजर्चा भरणा करीत होती़ परंतु आता राज्यभर सुरु असलेल्या शेतक:यांच्या कजर्माफीच्या विषयामुळे शेतकरी कर्ज भरण्यास सरसावत नसल्याचेच यातून दिसून येत आह़े दरम्यान यंदाच्या हंगामात तालुकानिहाय कर्ज वाटपाचा आढावा घेतल्यास, नंदुरबार तालुका 10 कोटी 91 लाख 77 हजार, शहादा व धडगाव मिळून 8 कोटी 13 लाख 31 हजार, तळोदा तालुका 1 कोटी 97 लाख 68 हजार, अक्कलकुवा तालुका 24 लाख 48 हजार तर नवापूर तालुक्यात 1 कोटी 84 लाख 97 हजार रुपयांचे कर्ज वाटप आतार्पयत करण्यात आले आह़े