नंदुरबारात आठवडाभरापासून सूर्यदर्शनच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:12 PM2018-07-25T13:12:03+5:302018-07-25T13:12:08+5:30

पावसाची रिपरिप सुरुच : भिजपावसाने पिके तरारली तर जलसाठे मात्र कोरडेच

Nandurbar does not have sunshine since the week. | नंदुरबारात आठवडाभरापासून सूर्यदर्शनच नाही..

नंदुरबारात आठवडाभरापासून सूर्यदर्शनच नाही..

Next

नंदुरबार : गेल्या आठवडाभरापासून नंदुरबारात रिमङिाम पाऊस सुरु आह़े मंगळवारीसुध्दा पहाटेपासूनच संततधार पावसाने हजेरी लावली होती़ पावसाची रिपरिप व ढगाळ हवामानामुळे गेल्या आठवडय़ापासून नंदुरबारकरांना सूर्यदर्शनाची प्रतीक्षा आह़े 
नंदुरबारसह खान्देश व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खाते तसेच स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेतर्फे देण्यात आला आह़े गेल्या चार दिवसांपासून नंदुरबार शहरासह, नवापूर, शहादा, अक्कलकुवा, तळोदा व धडगाव आदी ठिकाणी पावसाची रिपरिप सुरुच आह़े यामुळे बळीराजा चांगलाच सुखावला असल्याचे चित्र दिसून येत आह़े जवळपास सर्वच ठिकाणच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत़ संततधार पावसामुळे शेती पिकांना फायदा मिळत असला तरी, या पावसामुळे अद्याप कुपनलिका, विहिर, नद्या-नाले आदी जलस्त्रोत अद्याप भरलेले नाहीत़ जिल्ह्यात मुसळधार पावसाची आवश्यकता आह़े रिमङिाम पावसामुळे जमिनीतील पाणी पातळीत काही प्रमाणात का होईना भर पडत असल्याचे सांगण्यात येत आहेत़ 
कष्टक:यांची उडाली दाणादाण
मंगळवार नंदुरबारातील बाजाराचा दिवस असल्याने भिजपावसात आपला माल विकायला आलेले शेतकरी, कष्टक:यांची चांगलीच दाणादाण उडाली़ दिवसभर पावसाची संततधार सुरु असल्याने अनेकांनी छत्र्यांचा आधारत घेत भरपावसातच सुभाष चौक, मंगळ बाजार, तुप बाजार आदी ठिकाणी आपली दुकाने मांडली होती़ पावसामुळे बाजारावर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आल़े 
संततधार पावसामुळे दिवसभरात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता़ कुठे ब्रेक डाऊन तर कुठे पावसामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता़ 
पुढील तीन दिवस पावसाची
 रिपरिप कायम राहणार
भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस नंदुरबारसह संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार आह़े बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे हा अतिवृष्टीचाही इशारा मध्य महाराष्ट्रात देण्यात आला आह़े पावसामुळे पिकं तग धरु लागल्याने शेतक:यांमध्येही साहजिकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आह़े 
दमदार पाऊस व्हावा
जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु असली तरी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही़ जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर पाणी साठवणुकीसाठी चा:या तसेच खड्डे खोदण्यात आलेले आहेत़ त्यामुळे दमदार पाऊस होऊन याव्दारे जमिनीत पाण्याचे सिंचन व्हावे तसेच विविध जलस्त्रोतांची पाणी पातळी वाढावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े  अद्यापही कुपनलिकांना पाणी लागले नाही तर, विहिरीसुध्दा कोरडय़ा पडल्या आह़े त्यामुळे मुसळधार पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े 
राज्यात केवळ नंदुरबार जिल्ह्यातच सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आह़े नंदुरबार जिल्ह्याच्या तुलनेत जळगाव व धुळे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याचे दिसून येत आह़े 
 

Web Title: Nandurbar does not have sunshine since the week.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.