प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबारातील ईपीएस पेन्शनरांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:37 PM2018-07-06T12:37:54+5:302018-07-06T12:38:05+5:30
नंदुरबार : ईपीएस 1995 निवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता़ विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात जिल्ह्यातील पेन्शनर मोठय़ा संख्येने सहभागी होत़े
यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इपीएस पेन्शनरांना 9 हजार पेन्शन व महागाई भत्ता द्या, कोशियरी समितीच्या शिफारशी लागू करा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय तात्काळ लागू करण्यात यावा, सर्वासाठी ईएसआय लागू करून सक्षम व्यवस्था द्या, कम्प्युटेशन रकमेची पुर्नस्थापना करा, आरओसी सुविधा लागू करा, हयातीचे दाखले हे स्थानिक बँकांमध्ये देण्याचे आदेश करण्यात यावेत तसेच केंद्रीय मंत्री यांच्या 29 मे 2018 रोजी देण्यात आलेल्या पत्रानुसार निर्माण झालेला असंतोष दूर करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़ निवेदनावर सुधाकर धामणे, क़ेडी़गिरासे, रामभाई पटेल, रोहिदास सौपुरे, सुभाष रघुवंशी, अनिल बरे, दिनेश साळी, वामनराव चौधरी आदींच्या सह्या आहेत़