नंदुरबारात जलस्त्रोतांवर ओढावतेय संकट..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:31 PM2018-01-06T12:31:40+5:302018-01-06T12:31:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या काही वर्षात जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टीक कच:याची मोठी समस्या भेडसावत आह़े या कच:यामुळे तळोदा, शहादा, नवापूर आदी शहरांतील नद्या नाल्यांसह विविध जलस्त्रोत आता संकटात सापडतात की काय असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला आह़े त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे आह़े
प्लॅस्टीक पिशव्यांवर बंदी असतानाही येथील व्यावसायिकांकडून मोठय़ा संख्येने प्लॅस्टीक पिशव्याचा वापर होत असल्याचे दिसून येत आह़े विविध नगरपालिकांच्या प्रशासनाकडून यांनी याबाबत ठोस भूमिका घेत प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर करणा:यांवर कारवाई करण्याची अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आह़े याबाबात पालिका प्रशासनाकडून अनेक वेळा शहरातील व्यावसायिकांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत़ शिवाय या पुढे प्लॅस्टीक पिशव्याचा वापर करु नका असा निर्वानिचा इशाराही संबंधिताना देण्यात आला होता़ परंतु तरीदेखील प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर कमी होताना दिसून येत नाही आह़े त्यामुळे आता प्रशासनानेच कडक भूमिका घेत दोषींवर कारवाईचा बडगा उगारावा अशी अपेक्षा पर्यावरणवाद्यांकडून करण्यात येत आह़े
जिल्ह्यात विविध ठिकाणच्या अनेक चहा व्यावसायिकांकडूनही मोठय़ा संख्येने प्लॅस्टीकच्या कपांचा वापर होत आह़े त्याचा वापर कमी व्हावा यासाठीही प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आह़े याबाबत व्यापा:यांनीदेखील योग्य भूमिका घेणे महत्वाचे आह़े पर्यावरणाची निगा राखण्यासाठी त्यांनी उपाययोजना करणे गरजेचे आह़े
प्लॅस्टीकचा वापर कमी व्हावा यासाठी प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय असने आवश्यक असल्याचे मत पर्यावरणावाद्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े अनेक वेळा कागदी पिशव्यांवा वापर हा होत असतो़ परंतु यात सातत्या असने आवश्यक आह़े
त्यामुळे जोर्पयत प्लॅस्टीक पिशव्यांना पर्याय उपलब्ध होत नाही तोर्पयत प्लॅस्टीकचा वापर कमी होणे शक्य नसल्याचाही विचारप्रवाह आह़े त्यामुळे याकडे राज्य सरकारने योग्य भूमिका घेत, प्लॅस्टीकला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात येत आह़े