नंदुरबारला 30 टक्के पाणीपुरवठा करणारा स्त्रोत झाला बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:58 AM2019-05-26T11:58:07+5:302019-05-26T11:58:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला कधी नव्हे अशी यंदा पाणी टंचाईची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. एकुण पाणी ...

Nandurbar gets 30 percent water supply! | नंदुरबारला 30 टक्के पाणीपुरवठा करणारा स्त्रोत झाला बंद!

नंदुरबारला 30 टक्के पाणीपुरवठा करणारा स्त्रोत झाला बंद!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराला कधी नव्हे अशी यंदा पाणी टंचाईची अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. एकुण पाणी पुरवठय़ापैकी 30 टक्के पाणी पुरवठा करणारा आंबेबारा प्रकल्प कोरडा झाला आहे. विरचक प्रकल्पात देखील अवघा 22 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. यामुळे पालिकेने यापूर्वीच पाणी कपात केली असली तरी सध्या वेळापत्रक मात्र विस्कळीत झाले आहे. 
शहराला विरचक प्रकल्पातून 70 टक्के तर आंबेबारा प्रकल्पातून 30 टक्के पाणी पुरवठा केला जातो. विरचकमधील सर्व पाणी पालिकेसाठी आरक्षीत असते तर आंबेबारा प्रकल्प पुर्ण 100 टक्के भरल्यास त्यातील 50 टक्के पाणी आरक्षीत केले जाते. यंदा अवघा 60 टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे आंबेबाराचा पुर्ण पाणीसाठा आरक्षीत करण्यात आला होता. परंतु हा साठा देखील आता आटला आहे. शिवाय आष्टे पंपींग स्टेशनची विहिर देखील आटली आहे. त्यामुळे येथून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. वीरचक प्रकल्पात देखील केवळ 22 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. आणखी तीन ते चार आठवडय़ात केवळ मृत साठा शिल्लक राहणार आहे. जर पाऊस लांबला तर शहरवासीयांना पाणी-बाणीच्या स्थितीला सामोरे जावे लागणार आहे. विजेची समस्येमुळे शहरातील जलकुंभांमध्ये पाणीसाठा होण्यास वेळ लागत असून  शहरातील सर्वच भागातील पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडले आहे.  गेल्या दहा दिवसांपासून ही समस्या आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेतर्फे वेळोवेळी करण्यात येत आहे. 
पाण्याचा अपव्यवय करणा:यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अनेक कुटूूंब अंगणात पाणी शिंपडणे, टाकी भरली तरी ती तशीच वाहू देणे, वाहने धुणे, नळांना तोटय़ा न बसविणे, घरातील बेशीन, स्वच्छतागृहात पाणी वाहू देणे असे प्रकार करतात. पाण्याचे मोल ज्यांना नाही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलणे आवश्यक असल्याच्या सुज्ञ नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे.
 

Web Title: Nandurbar gets 30 percent water supply!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.