नंदुरबारमध्ये सव्वानऊ कोटींचा घनकचरा प्रकल्प मंजुर

By admin | Published: June 6, 2017 11:52 AM2017-06-06T11:52:22+5:302017-06-06T11:52:22+5:30

नंदुरबार पालिकेच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता, ओला व सुका कचरा संकलीत होणार

Nandurbar has sanctioned projects worth crores of rupees | नंदुरबारमध्ये सव्वानऊ कोटींचा घनकचरा प्रकल्प मंजुर

नंदुरबारमध्ये सव्वानऊ कोटींचा घनकचरा प्रकल्प मंजुर

Next

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.6 : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत शासनाने नंदुरबार पालिकेसाठी नऊ कोटी 37 लाख रुपयांचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. 
इंदोर शहराचा देशात स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांक आला आहे. तेथे राबविण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तेथे ज्या कंपनीने हा प्रकल्प तयार केला त्याच कंपनीतर्फे नंदुरबारात हा प्रकल्प करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेकडे जवळपास दहा हेक्टर जमिन उपलब्ध आहे. या मंजूर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या संपुर्ण जमिनीस संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. शहरात निर्माण होणारा कचरा ओला व सुका स्वतंत्रपणे संकलनासाठी 20 चारचाकी घंटागाडय़ा उपलब्ध होणार आहे. तसेच 46 हातगाडय़ा देखील उपलब्ध होतील. घनकचरा व्यवस्थापन अद्यावत पद्धतीने करण्यासाठी शेडचे बांधकाम करून खत प्रकल्प व प्लास्टिक पुनर्रवापर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. 
या व्यवस्थापनाच्या ठिकाणी स्वतंत्र पाणी पुरवठा वाहिणी टाकण्यात येवून 50 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येईल. तसेच शहरातील व्यावसायिक भागात 100 लिटर क्षमतेचे अत्याधुनिक कचराबिन्स ठेवण्यात येणार आहेत. कच:याचे शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रिनिंग मशिनद्वारे विलगीकरण करण्यात येईल. मंजुर प्रकल्पात घनकचरा व्यवस्थापन ठिकाणी कर्मचा:यांसाठी निवास व्यवस्था, वजनकाटा तसेच आग विझविणारी यंत्रणा उभारण्यात येईल. या ठिकाणी एक मोठे टिपर व एक जेसीबी मशिन कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे. 
या प्रकल्पामुळे तसेच शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येणा:या घनकचरा प्रक्रियेमुळे नंदुरबार शहर स्मार्ट सिटी म्हणून निवड होण्यास मदत होणार आहे. 

Web Title: Nandurbar has sanctioned projects worth crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.