नंदुरबार येथे गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:30 PM2019-08-30T12:30:00+5:302019-08-30T12:30:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सुरत येथील हुतात्मा शिरीषकुमार मेहता एज्युकेशन अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट व नंदुरबार येथील संकष्टादेवी ट्रस्टतर्फे ...

Nandurbar honors a quality student | नंदुरबार येथे गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव

नंदुरबार येथे गुणवंत विद्याथ्र्याचा गौरव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सुरत येथील हुतात्मा शिरीषकुमार मेहता एज्युकेशन अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट व नंदुरबार येथील संकष्टादेवी ट्रस्टतर्फे येथील लोकमान्य टिळक वाचनालय सभागृहात दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्याथ्र्याचा गुणगौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी राष्ट्रसेविका समितीच्या नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख स्मिता वावदे तर प्रमुख अतिथी म्हणून हुतात्मा शिरीषकुमार ट्रस्ट सुरतच्या संचालिका जागृती मेहता, सदस्य उत्सव पाठक, पार्थ मेहता, संकष्टादेवी ट्रस्टचे संचालक अशोक जोशी, कर सल्लागार संतोष नानकाणी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंत चौधरी, रामदास कोळी, मनोहर बजाज, माळी, देवकन्या सोनार उपस्थित होते. या वेळी स्मिता वावदे म्हणाल्या की, निसर्गाने मुक्तहस्ताने दिलेल्या संपत्तीचे जतन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. मातृभूमीची सेवा, साधना करताना क्षमता विकसित करण्याचे धैर्य अंगी बाळगावे. कुटुंब व देशाच्या प्रगतीसाठी युवकांनी दिशा निश्चित करावी, असे सांगितले. संतोष नानकाणी म्हणाले की, मुंबई-पुण्यापेक्षा नंदुरबारला कमी विद्यार्थी असल्याने कर क्षेत्रात भरपूर शिखर गाठायचे आहे. जिल्ह्यातून 100 कर सल्लागार निर्माण व्हावेत यासाठी मी सहकार्य करण्याचे ध्येय ठेवले असून यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रय} असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्सव पाठक, जागृती मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दीपक आर्य यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा ब:हाणपूरकर यांनी तर आभार  हिरणवाळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दीपक आर्य, अथर्व पंडय़ा, पार्थ मेहता, ओम राजपूत, कमलेश कासार, बाबूलाल पाडवी, कल्पेश जव्हेरी यांनी परिश्रम घेतले. 

Web Title: Nandurbar honors a quality student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.