नंदुरबारातील कुपनलिका, विहिरी ठरताय निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:35 AM2019-02-14T11:35:43+5:302019-02-14T11:35:51+5:30

नंदुरबार : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतातील कुपनलिका व विहिरी चार महिन्यांपासून कोरड्या पडल्याने शेतकरी त्यातील विद्युत मोटारी ...

Nandurbar kupnalika, well-drained waste | नंदुरबारातील कुपनलिका, विहिरी ठरताय निरुपयोगी

नंदुरबारातील कुपनलिका, विहिरी ठरताय निरुपयोगी

Next

नंदुरबार : दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतातील कुपनलिका व विहिरी चार महिन्यांपासून कोरड्या पडल्याने शेतकरी त्यातील विद्युत मोटारी व इतर विद्युत साहित्य काढून घेत आहेत. पावसाळ्यानंतरच अर्थात जुलै, आॅगस्ट महिन्यातच आता विद्युत मोटारी टाकल्या जाणार आहेत. दरम्यान, शेतांमधील विद्युत साहित्य आणि शेती साहित्य चोरीच्या घटना वाढल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.
जिल्ह्यात यंदा सरासरीचा केवळ ६८ टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात तर सरासरीचा केवळ ४५ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भुगर्भातील पाणी पातळी कमालीची खोल गेली आहे. रब्बी हंगामाला देखील त्याचा फटका बसला आहे. पिण्याला पाणी नाही तर पिकांना कुठून पाणी देणार या विवंचनेत शेतकरी आहेत. परिणामी विहिरी व कुपनलिका केवळ शोभेच्या वस्तू म्हणून उरल्या आहेत. शेतांमध्ये सर्वत्र उजाड दिसून येत आहे.
विहिरींमध्ये ठणठणाट
नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी, कोपर्ली, रनाळे, भालेर या परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी व कुपनलिका कोरड्या पडल्याने खाजगी विहिर व विंधन विहिर अधिग्रहण प्रशासनाकडून केले जात आहे. परंतु भुगर्भातच पाणी नाही तर विहिरी व विंधनविहिरींना कुठून पाणी येणार ही समस्या आहे. त्यामुळे अधिग्रहण करून देखील उपयोग नसल्याची स्थिती आहे.
परिणामी पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थ व शेतकरी मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
विद्युत मोटारी काढल्या
यंदा सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यातच कुपनलिका व विहिरी कोरड्या पडल्याने त्या गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. अशा ठिकाणांहून चोरटे मोटारी व केबल चोरून नेत आहेत. परिणामी शेतकºयांवर दुहेरी संकट ओढावत आहे. ही बाब लक्षात घेता बंद पडलेल्या कुपनलिका व विहिरींमधून आता शेतकरी विद्युत मोटर व केबल काढून घरी आणत आहेत.
आणखी किमान सहा ते सात महिने कुपनलिका किंवा विहिरींना पाणी येणे शक्य नाही. जुन किंवा जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला तरच भुगर्भातील पाणी पातळी वाढून त्यांना पाणी येणार आहे.

Web Title: Nandurbar kupnalika, well-drained waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.