मशिदीसमोर गुलाल न उडविण्याचा नंदुरबारातील मंडळांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:53 PM2018-09-22T15:53:23+5:302018-09-22T15:53:36+5:30
गणेश मंडळ : जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद
नंदुरबार : मुस्लिम समाजाने मोहर्रमनिमित्त निघणा:या आखाडा मिरवणुका गणेशोत्सवानंतर काढण्याचा निर्णय घेतला आहे. आता गणेश मंडळांनीही मशिदीसमोर गुलाल न उडविण्याचा व मुस्लिम बहुल भागात जास्तवेळ मिरवणुका रेंगाळत न ठेवण्याचा निर्णय घेतल्याने शहरात सामाजिक सौहार्दाचे वातावरण तयार होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी व जिल्हा पोलिस अधिक्षक संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत संत सावता माळी गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवातच इमाम बादशाह दर्गावर ऊरूस भरणार आहे. या ऊरूसमध्ये मोठया संख्येने भाविक हजेरी लावतात. दोन्ही सण शांततेत साजरे व्हावेत, यासाठी पोलिस विभागाकडून सातत्याने समाज प्रबोधन करण्यात येत आहे. शांतता बैठक, त्यानंतर गणेश मंडळ पदाधिका:यांची स्वतंत्र बैठक व मोहर्रममध्ये काढण्यात आलेल्या आखाडयांच्या पदाधिका:यांची बैठक घेण्यात आली. मुस्लीम समाजाच्या पदाधिका:यांनी मोहर्रममध्ये आखाडयाची मिरवणूक रद्द करून एक पाऊल पुढे ठेवले. याला सकारात्मक प्रतिसाद देत संत सावता माळी व्यायाम शाळेच्या गणेशमंडळांनी मशिदीसमोर गुलाल न उधळण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष नरेंद्र माळी यांनी मंडळाच्या कार्यकत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला. तसेच इलाही चौकात कमी वेळात लेङिाम खेळून गणपती पुढे नेण्यात येणार आहे. त्यामुळे इलाही चौकात ऊरूस निमित्त जमलेल्या मुस्लीम भाविकांचा आदर राखला जाणार आहे. बैठकीत माळी समाजाचे अध्यक्ष आनंदा माळी, सावता माळी गणेश मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र माळी, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, मोहन माळी, खजीनदार लोटन मराठे, किसन देवाजी माळी, भरत माळी, पुनम माळी, शिवाजी माळी, बाबूलाल माळी, पंडित माळी, छोटू माळी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी व पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार, शहर पोलिस निरीक्षक गिरीश पाटील उपस्थित होते.