नंदुरबार बाजारात कांदा दर घसरल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:00 AM2018-04-20T11:00:06+5:302018-04-20T11:00:06+5:30

In the Nandurbar market, due to the decline in onion prices, the farmers suffer | नंदुरबार बाजारात कांदा दर घसरल्याने शेतकरी संकटात

नंदुरबार बाजारात कांदा दर घसरल्याने शेतकरी संकटात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उन्हाळी कांदा पिकाची आवक वाढल्याने दरांमध्ये घसरण झाली आह़े परिणामी शेतकरी संकटात सापडला असून नंदुरबारसह स्थानिक बाजारात दरांमध्ये वाढ होत नसल्याने कांदा परराज्यात रवाना होण्यास सुरूवात झाली आह़े 
जिल्ह्यात यंदा 1 हजार 800 हेक्टर्पयत उन्हाळी कांद्याची लागवड झाली होती़ त्याचे उत्पादन येण्यास सुरूवात झाली असून नंदुरबार बाजार समितीत दर दिवशी सरासरी 500 क्विंटलर्पयत कांदा आवक सुरू झाली आह़े गेल्या काही महिन्यात वेळोवेळी कांदा दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होत़े दोन महिन्यांपूर्वी 35 रूपये प्रतिकिलो या दराने विक्री होणारा कांदा गेल्या चार दिवसात 7 ते 10 रूपये प्रतिकिलो या दरांवर आला होता़ यातून एकीकडे सामान्यांमध्ये समाधान असले तरी लागवडीचा भरघोस खर्च करून बाजारात कांदा आणणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़  नंदुरबार बाजारात गेल्या 10 दिवसांपासून सातत्याने 500 क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक कांदा आवक झाली आह़े यामुळे दरांमध्ये प्रचंड घट झाली आह़े येथे दर मिळत नसल्याने शेतकरी मध्यप्रदेशातील इंदौर किंवा मग गुजरात राज्यातील अहमदाबादसह इतर बाजारपेठांचा रस्ता धरत आहेत़ त्याठिकाणी व्यापारी कांद्याला साजेसे दर देत असल्याने शेतक:यांचा ओढा वाढत आह़े यातून येत्या महिन्यात पुन्हा कांदा टंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े

Web Title: In the Nandurbar market, due to the decline in onion prices, the farmers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.