नंदुरबारात महिनाभर आधीच मिरची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:52 PM2018-09-22T15:52:15+5:302018-09-22T15:52:24+5:30

नंदुरबार बाजार समिती : सुरुवातीलाच भाव 1400 ते 2100 रुपयांर्पयत

Nandurbar in the month of already started the arrival of chillies | नंदुरबारात महिनाभर आधीच मिरची आवक सुरू

नंदुरबारात महिनाभर आधीच मिरची आवक सुरू

googlenewsNext

नंदुरबार : यंदा महिनाभर आधीपासून लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. भाव देखील 1400 ते 2100 रुपयांर्पयत मिळत असल्यामुळे शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. हिरव्या मिरचीला अगदीच कमी भाव मिळत असल्यामुळे आता मिरची लाल झाल्यावर ती थेट बाजारात विक्रीसाठी आणली जावू लागली आहे. सध्या आवक कमी असली तरी येत्या काळात ती वाढण्याची शक्यता आहे.
नंदुरबारच्या बाजारात साधारणत: ऑक्टोबरच्या दुस:या किंवा तिस:या आठवडय़ापासून लाल मिरचीची आवक सुरू होत असते. खान्देशात मिरचीचे सर्वात मोठे मार्केट म्हणून नंदुरबारच्या मार्केटकडे पाहिले जाते. येथील बाजारभावावरूनच इतर मार्केटमधील बाजार भावावर देखील परिणाम होत असतात. यंदा मिरचीची लागवड गेल्या वर्षाच्या तुलनेत असली तरी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पादकता कमी होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली. परंतु वेळेआधीच लाल मिरची बाजारात आल्याने पथारीवर लाल गालिचा पसरण्यास सुरुरवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून साधारणत: 200 ते 400 क्विंटल आवक होत आहे. येत्या काळात ती आणखी वाढण्याची शक्यताही बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी वर्तविली.
हिरवी मिरचीला भाव कमी
सध्या बाजारात हिरवी मिरचीची ढेसर झाली आहे, परिणामी भाव अवघा 700 ते 800 रुपये क्विंटल असा मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून बाजार समितीच्या आवारातच हिरवी मिरचीची पथारी देखील पहावयास मिळत आहे. हिरवी मिरचीला एवढा कमी भाव मिळत असल्यामुळे शेतक:यांनी आता ती लाल करूनच बाजारात आणण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी देखील हिरवी मिरची साधारणत: सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासूनच दाखल झाली होती. यंदासारखीच आवकची परिस्थिती होती. परिणामी बाजार समितीच्या आवारात ठिकठिकाणी हिरवी मिरची वाळविण्यासाठी पथारीसारखी टाकली जात होती. 
लाल झाल्यावर विक्री 
हिरव्या मिरचीला भाव कमी असल्यामुळे शेतकरी थोडा त्रास सहन करून मिरची लाल झाल्यावरच ती बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. गेल्या तीन दिवसात दररोज सरासरी 300 ते 400 क्विंटल आवक होत  आहे. 
बाजार समितीत दररोज तीन ते चार वाहने येऊ लागली आहेत. सध्या येणारी मिरचीची प्रतवारी देखील चांगल्या प्रकारची असल्याचे व्यापा:यांचे म्हणने आहे. 
आवक होणा:या मिरचीमध्ये व्हीएनआर आणि लाली या जातीच्या मिरचीचा समावेश आहे. लवकरच फाफडा, व्हिनेगार, शंकेश्वरी या मिरचीची आवक होण्याची शक्यता आहे. साधारणत: दस:यानंतर येथील मिरची बाजारात सरासरीच्या तुलनेत आवक सुरू होण्याची शक्यता      आहे.
पाऊस नसल्याने खरेदी
सध्या पाऊस नसल्याने लाल मिरची खरेदी करण्यास व्यापारीही उत्सूक आहेत. लाल मिरची खरेदी केल्यास ती सुकविण्यासाठी पथारींवर टाकावी लागते. सध्या पावसाळा सुरू असला तरी पावसाचे कुठलेही चिन्हे नाहीत. त्यामुळे खरेदी केलेली मिरची सुकवून घेण्यासाठी पुरेसा     कालावधी मिळणार असल्यामुळे मिरची खरेदीला ब:यापैकी प्रतिसाद आहे. 
पाऊस आल्यास मिरची पथारीवरील मिरची सांभाळण्याची मोठी कसरत होत असते. त्यामुळे जास्तीत जास्त व्यापारी ऑक्टोबरनंतरच मिरची खरेदीला पसंती देत असतात.
 

Web Title: Nandurbar in the month of already started the arrival of chillies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.