नंदुरबार पालिकेचा लहान व्यावसायिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 12:03 PM2020-10-01T12:03:48+5:302020-10-01T12:03:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला होता. त्यामुळे पालिकेने पालिकेच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्पलेक्समधील दुकानगाळे धारकांना तीन ...

Nandurbar Municipal Corporation gives relief to small businessmen | नंदुरबार पालिकेचा लहान व्यावसायिकांना दिलासा

नंदुरबार पालिकेचा लहान व्यावसायिकांना दिलासा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला होता. त्यामुळे पालिकेने पालिकेच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्पलेक्समधील दुकानगाळे धारकांना तीन महिन्याचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याबाबत सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी दिली. यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.
कोरोनामुळे २२ मार्चपासून संपुर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. साधारणत: अडीच ते तीन महिने पुर्ण व्यवहार बंद होते. जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू होते. जून महिन्यापासून काही अंशी शिथीलता आली. परंतु तरीही व्यवहाराची गाडी रुळावर येण्यासाठी आॅगस्ट उजाडला होता. अद्यापही अनेकांचा व्यवसाय रुळावर आलेला नाही. काही लहान व्यवसायिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती पहाता पालिकेने या व्यावसायिकांच्या मदतीला धावण्याचा निर्णय घेतला आहे.
नंदुरबार पालिकेचे शहरातील सर्वच भागात व्यापारी संकुल आहेत. त्यात अनेक दुकाने ही भाड्याने देण्यात आली आहेत. भाड्याने दुकान घेणाऱ्यांमध्ये किराणा, कटलरी, केश कर्तनालये, फळ, भाजीपाला विक्रेते यासह इतर लहान मोठे व्यावसायिक आहेत. त्यांना लॉकडाऊनच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला. दुकाने बंद असतांना त्यांचे भाडे भरावे लागणार असल्याने मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली होती.
ही बाब लक्षात घेता नगराध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी अशा व्यावसायिकांचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. किमान तीन महिन्याचे भाडे माफ केले जाणार आहे. त्यासाठी तसा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश संबधीतांना देण्यात आले आहेत. लवकरच याबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव केला जाणार असल्याची माहितीही नगराध्यक्षांनी दिली.
या निर्णयामुळे लहान, मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.


पालिकेने नेहमीच सर्वसामान्य नागरिक आणि लहान, मोठ्या व्यावसायिकाचे हित पाहिले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यावयिसाकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे पालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकानदारांना तीन महिन्याचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. असा निर्णय घेणारी नंदुरबार पालिका ही पहिलीच ठरणार आहे.
-रत्ना चंद्रकांत रघुवंशी,
नगराध्यक्षा, नंदुरबार.

Web Title: Nandurbar Municipal Corporation gives relief to small businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.