नंदुरबारच्या नगरसेवकाचे पाकीट  मारणारे दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:20 PM2019-06-30T12:20:48+5:302019-06-30T12:22:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गर्दीत नगरसेवकाचा मोबाईल  व खिशातील रोख रक्कम असा   एकुण 77 हजार 500 रुपयांचा ऐवज ...

Nandurbar municipal wallet wounded both of them | नंदुरबारच्या नगरसेवकाचे पाकीट  मारणारे दोघे जेरबंद

नंदुरबारच्या नगरसेवकाचे पाकीट  मारणारे दोघे जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गर्दीत नगरसेवकाचा मोबाईल  व खिशातील रोख रक्कम असा   एकुण 77 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी करणा:या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने पकडले. दरम्यान, पाकीटमार करणारे संशयीत मंगळवारी शहरात निघालेल्या एका रॅलीत येणार असल्याची माहिती मिळाल्यावर एलसीबीचे कर्मचारी शेतक:यांच्या वेशात रॅलीत सहभागी झाले होते.  
संदीप सुनील बोरसे (23) रा. पवननगर, खर्दे, ता.शिरपूर व रुपेश वाल्मीक शिरसाठ (19) रा.खर्दे ता.शिरपूर अशी संशयीतांची नावे आहेत.  नंदुरबारचे नगरसेवक गौरव प्रकाश चौधरी हे विजय चौधरी यांच्या रॅलीत मंगळवारी सहभागी झाले होते. गणपती मंदीर चौकात रॅलीत चौधरी यांच्या खिशातील महागडा मोबाईल आणि  रोख रक्कम असे एकुण 77 हजार  500 रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी                  चोरून नेला होता. गौरव चौधरी यांनी लागलीच शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. गेल्या काही दिवसांपाूसन बाजाराच्या दिवशी पाकीटमारीच्या घटना वाढल्या होत्या. शिरपूर येथील पाकीटमार असल्याची खात्री एलसीबीला मिळाली होती.  गेल्या मंगळवारी देखील संबधीत पाकीटमार येणार असल्याची माहिती एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली होती. त्यानुसार                 दिवसभर कर्मचारी साध्या वेशात बाजारात फिरत होते. शिवाय बाजाराच्या दिवशीच विजय चौधरी यांची देखील  रॅली असल्याने या रॅलीत पाकीटमार घुसतील ही शक्यता लक्षात घेता एलसीबीच्या कर्मचा:यांनी शेतक:यांचा वेश घेत रॅलीत सहभाग घेतला. याच दरम्यान चोरटय़ांनी नगरसेवक चौधरी यांचे पाकीट मारले. ही बाब पोलिसांना कळताच त्यांनी शहरात रेकी सुरू केली. संशयीत शहरातून पळून जावू नये  म्हणून लागलीच विविध ठिकाणे पिंजून काढली. बसस्थानक परिसरातील चहाच्या टपरीवर संशयीत दोघे       आपसात चर्चा करतांना आढळून आले. त्यांना झडप घालून ताब्यात घेतले.  त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची  उत्तरे दिली. पोलीसी हिसका दाखवला असता त्यांनी गौरव चौधरी यांचे पाकीट मारल्याची कबुली दिली. 
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून  अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, पोलीस कर्मचारी राकेश मोरे, विजय ढिवरे, आनंदा मराठे, अभय राजपूत, विकास पाटील यांनी  केली. 
 

Web Title: Nandurbar municipal wallet wounded both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.