नंदुरबार पालिकेत आता सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:54 PM2018-04-05T12:54:42+5:302018-04-05T12:54:42+5:30
मंगळवारच्या घटनेनंतर घेतला निर्णय : 15 पेक्षा अधीक कॅमेरे बसविणार
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 5 : मंगळवारी पालिकेत झालेल्या राडय़ानंतर आता संपुर्ण इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. साधारणत: 15 कॅमेरे बसविले जाणार आहेत. पालिकेची सध्याची इमारत ही पूर्वीच्या जेपीएन रुग्णालयाची इमारत आहे. नवीन इमारत आकारास येत नाही तोर्पयत पालिकेचे कामकाज येथूनच सुरू राहणार आहे.
पालिकेच्या पूर्वीच्या इमारतीच्या जागेवर टोलेजंग व्यापारी संकुल निर्माण झाले आहे. यापूर्वी पालिका इमारतीला मिळालेली जागा ही वादाच्या भोव:यात सापडल्याने तुर्तास पालिकेचे कामकाज हे पालिकेच्याच पूर्वीच्या जेपीएन रुग्णालयात सुरू करण्यात आले आहे. याच ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
सव्र्हेक्षण करण्याचा सुचना
सध्याच्या पालिका इमारतीत कुठे सीसीटीव्ही कॅमेर बसवावे याबाबतचे सव्र्हेक्षण करण्याच्या सुचना तडकाफडकी देण्यात आल्या आहेत. पालिकेचे मुख्य दोन प्रवेशद्वार, दोन्ही पॅसेज, दोन्ही जिना, अध्यक्षा, मुख्याधिकारी व सभागृह आणि काही मुख्य विभागात हे कॅमेरे बसविण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात हे काम पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारा निधी हा पालिका फंडातून खर्च केला जाणार आहे.
कालच्या प्रकारानंतर जाग
मंगळवारी पालिकेत बाहेरच्या लोकांनी येवून जो राडा केला त्यामुळे पालिकेला आता जाग आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे राहिले असते तर बाहेरच्या कुठल्या लोकांनी येवून पालिकेत राडा केला हे कळाले असते. पोलिसांनाही अशा लोकांची नावे निष्पन्न करण्यास मदत झाली असती. परंतु पालिका आवारात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे संबधीत संशयीतांना शोधण्यात अडचणी येणार आहेत.
कर्मचा:यांवरही नजर
या निर्णयामुळे पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही पालिका प्रशासनाला नजर ठेवण्यास सोयीचे ठरणार आहे. इमारतीच्या वेगवेगळ्या भागात काही विभाग विखुरले गेले असल्यामुळे कोण कर्मचारी केंव्हा येतो, कधी जातो याची माहिती नसते. त्यामुळे नियंत्रण ठेवणेही अधिका:यांना काही प्रमाणात जिकरीचे जाते. सीसीटीव्ही कॅमे:यामुळे आता ते सोयीचे ठरणार आहे.
इमारत जुनी व आकार कमी
पालिकेचा वाढता विस्तार आणि वाढते कामकाज लक्षात घेता सध्याची इमारत ही तोकडी ठरत आहे. अनेक विभागातील कर्मचा:यांना अगदी दाटीवाटीने बसावे लागते. महत्वाची कागदपत्रे, अभिलेख यांना ठेवण्यासाठी देखील पुरेशी जागा नसल्याचे चित्र आहे. बैठक घेण्यास देखील मोठा हॉल नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नगराध्यक्षांच्या कॅबीनमध्येच बैठक घ्यावी लागत असते.
शहरात केवळ 30 कॅमेरे
नंदुरबार शहरात सद्य स्थितीत सार्वजनिक ठिकाणी केवळ 30 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. या सर्व कॅमे:यांचे नियंत्रण हे पोलिस विभागामार्फत शहरातील टिळक रस्त्यावरील फडके पोलीस चौकीत केले जाते.
याशिवाय काही मोठी व्यापारी प्रतिष्ठाने, कार्यालये, बँका व धार्मिक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. त्यांचा चांगला उपयोग होत असतो. पोलिसांतर्फे सार्वजनिक ठिकाणी आणखी किमान 100 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी आहे. त्यादृष्टीकोणातून जिल्हा नियोजन व विकास समितीकडे निधीचीही मागणी करण्यात आलेली आहे.