नंदुरबारातील कुक्कुटपालनाची कोंडी यंदा फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:24 PM2018-05-17T12:24:14+5:302018-05-17T12:24:14+5:30

Nandurbar poultry impediment will break this year | नंदुरबारातील कुक्कुटपालनाची कोंडी यंदा फुटणार

नंदुरबारातील कुक्कुटपालनाची कोंडी यंदा फुटणार

Next

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 17 : एकात्मिक कुक्कुटविकास कार्यक्रमांतर्गत लाभार्थीना कमी वयाचे पक्षी वाटप करण्यात पशुसंवर्धन विभागाला अडचणी येत होत्या़ यातून योजनेत समावेश होऊनही लाभार्थीना कुक्कुटपालन करता येत नव्हत़े यावर मार्ग काढत शासनाने जिल्ह्यातील सहा ठिकाणी सधन कुक्कुटविकास पालन केंद्राची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आह़े 
पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या मंजूरीनुसार 1 हजार कुक्कुटपालन क्षमता असलेल्या केंद्रांची निर्मिती जिल्ह्यात होणार आह़े यात धडगाव, नवापूर, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि अक्कलकुवा या तालुक्याच्या ठिकाणी खाजगी भागीदारीतून पशुसंवर्धन विभाग अंडी उबणूक केंद्र आणि कुक्कुटपालन केंद्र अर्थात पोल्ट्री चालवणार आह़े याअंतर्गत एकात्मिक कुक्कुटविकास कार्यक्रमात समाविष्ट लाभार्थी शेतक:यांना चांगल्या दर्जाचे सुदृढ पक्षी येथेच उपलब्ध करून दिले जाणार आहेत़ नव्याने निर्माण करण्यात येणा:या तालुकानिहाय सधन कुक्कुटविकास केंद्रासाठी प्रत्येकी 10 लाख रूपयांच्या निधीला मंजूरी देण्यात येणार आह़े यातून भागीदार होणा:या युवक किंवा खाजगी कंपनीने पाच लाखांची गुंतवणूक करावयाची आह़े यात केंद्रासाठीचे निर्धारित क्षेत्र, बांधकाम, संरक्षक जाळ्या, पत्र्याची शेड, खाद्य याचा समावेश राहणार आह़े येथे शासनाकडून देण्यात येणा:या 1 हजार अंडी देणा:या कोंबडय़ांच्या माध्यमातून दोन हजार कोंबडय़ांची पैदास करून त्या लाभार्थीर्पयत पोहोचवणे तसेच त्यांची विक्री करण्याचे नियोजन असणार आह़े 
या केंद्रासाठी औरंगाबाद येथील पशुसंवर्धन विभागाच्या हॅचरीमधून पक्षी उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी आह़े पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, तळोदा आणि धडगाव या चार तालुक्यात सधन केंद्र उभे राहणार आहेत़ येत्या चार महिन्यात या केंद्रांची निर्मिती होऊन त्याद्वारे पक्ष्यांची पैदास होण्यासही सुरूवात होणार असल्याची अपेक्षा पशुसंवर्धन विभागाकडून व्यक्त करण्यात आह़े तूर्तास या योजनेसाठी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातून सर्वाधिक प्रतिसाद आह़े दुर्गम भागातील गावांमध्ये कुक्कुटपालन हा जोड व्यवसाय आह़े एकात्मिक कुक्कुटविकास कार्यक्रमांतर्गत 2017-18 या वर्षात 1 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ याअंतर्गत 29 लाभार्थीची निवड करण्यात आली होती़ या लाभार्थीना 25 मादी आणि 3 नर कोंबडय़ा घेण्यासाठी प्रत्येकी 3 हजार रूपये उपलब्ध करून देण्यात आले होत़े यात अक्कलकुवा भगदरी येथील 2 महिला गटांसह 14 लाभार्थी व जमाना येथील 14 लाभार्थीना निधी मंजूर केला होता़ मात्र या लाभार्थीना सात ते 8 दिवस वयाचे पक्षी मिळू शकले नाहीत़ गेल्यावर्षात मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थीचीही हीच स्थिती होती़ धुळे येथील जिल्हा परिषदेच्या सधन कुक्कुटविकास केंद्रातून किंवा औरंगाबाद येथील मुख्य अंडी उबवणूक केंद्रातून पक्षी आणताना त्यांची जिवित राहण्याची शक्यता कमी असल्याने जिल्ह्यात योजना रखडली होती़ 
पशुसंवर्धन विभाग कोळदा ता़ नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राकडून पक्षी तयार करून घेत होत़े परंतू तेथील कुक्कुटपैदास केंद्राची क्षमता कमी असल्याने योजनेत समाविष्ट लाभार्थीची गरज पूर्ण होऊ शकलेली नव्हती़ मात्र शासनाने प्रत्येक तालुक्यात एक केंद्र निर्मितीसाठी निधी मंजूर केल्याने लाभार्थीची कुक्कुटपालनाची कोंडी फुटली आह़े 
 

Web Title: Nandurbar poultry impediment will break this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.