शुक्रवारपासून नंदुरबार-पुणे स्लिपर कोच बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:59 PM2018-05-24T12:59:13+5:302018-05-24T12:59:13+5:30

प्रवाशांमध्ये समाधान : विविध आधुनिक सुविधा, खाजगी आराम बसला तोड

Nandurbar-Pune Slipper coach bus service from Friday | शुक्रवारपासून नंदुरबार-पुणे स्लिपर कोच बससेवा

शुक्रवारपासून नंदुरबार-पुणे स्लिपर कोच बससेवा

Next

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 24 : शुक्रवार 25 रोजीपासून नंदुरबार-पुणे स्लिपर कोच ‘शिवशाही’ सुरु करण्यात येत असल्याची माहिती आगारप्रमुख नीलेश गावीत यांनी दिली़ रोज रात्री नंदुरबार-पुणे शिवशाही रात्री 8 वाजता तर, पुणे-नंदुरबार रात्री साडेनऊ वाजता असेल़
शिवशाही सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली असून तिचे भाडे 972 ऐवढे आकारण्यात येणार आह़े शहादा येथून निघणारी शिवशाही दोंडाईचा, धुळेमार्गे जात होती़ त्यामुळे नंदुरबारसाठीही नंदुरबार-पुणे स्लिपर कोच शिवशाही सुरु करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती़ त्यानुसार एसटी महामंडळाकडून शिवशाही सुरु करण्यात आली        आह़ेनंदुरबार, साक्री, सटाणा, नाशिक, संगमनेर व पुणे असा जाण्याचा मार्ग राहिल तर, परत येताना सुध्दा पुणे, संगमनेर, नाशिक, सटाणा, साक्री व नंदुरबार असा मार्ग राहणार आह़े दरम्यान, नंदुरबार-पुणे स्लिपर कोच शिवशाहीमध्ये खाजगी आरामदाय बसप्रमाणे सर्व आधुनिक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत़ संपूर्ण वातानुकूलीत बस, मोबाईल चाजर्र पोर्ट, जीपीएस ट्रॅकिंग सुविधा, अग्निशमन बंब, एअर सस्पेंशन आदी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत़ यामुळे समाधान व्यक्त होत आह़े
 

Web Title: Nandurbar-Pune Slipper coach bus service from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.