दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनासाठी नंदुरबारकर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:18 AM2017-08-22T11:18:24+5:302017-08-22T11:40:20+5:30
ढोल-ताशांच्या गजरात नागरिक मंत्रमुग्ध : मुर्तीकारांकडून फिरवला जातोय अंतीम हात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विघ्नहर्ता येण्याची चाहूल आता सर्वाना लागली आह़े त्यामुळे नंदुरबार शहरातील मुर्तीकारदेखील गणेशमुर्तीवर अंतीम हात फिरविण्यात मगA आहेत़ गणपती अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले असल्याने मुर्तीची ‘फिनिशींग’ करण्यासाठी मुर्तीकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत़ सर्वत्र मोठय़ा गणेशमुर्ती सजविण्याचे त्यांना अलंकार चढविण्याचे काम मुर्तीकार करीत आहेत़
25 रोजी गणेश चतुर्थी असल्याने सर्वत्र गणेशभक्तांमध्ये गणरायाचे स्वागत करण्यासाठी लगबग सुरु झाली आह़े शहरातील लहान मुर्ती पूर्ण तयार झाल्या असल्या तरी अद्याप मोठय़ा मुर्तीवर मुर्तीकार अंतीम टप्प्यातील काम करीत आहेत़
जवळपास सत्तर टक्के मुर्तीची कामे पूर्ण झाली आहेत़ उर्वरित दोन दिवसांमध्ये सर्व मुर्ती तयार करण्याचे उद्दीष्ट असल्याचे मुर्तीकांराकडून सांगण्यात आले आह़े
शासनाकडून मोठय़ा प्रमाणात शाडुच्या तसेच मातीच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचे सांगण्यात येत आह़े याला नंदुरबारातील गणेशभक्तदेखील प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आह़े
नंदुरबारातील शाडु मातीच्या मुर्तीचे व्यावसायिक देविदास झवेरी यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी पेक्षा यंदा शाडु मातीच्या मुर्ती खरेदीला गणेशभक्तांची पसंती दिसून येत आह़े़ तसे पाहता प्लॅस्टर ऑफ पॅरीसपेक्षा शाडु मातीच्या मुर्ती महाग असतात़ त्यामुळे बहुतेक गणेशभक्ताकंकडून शाळुच्या मुर्ती खरेदी न करता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्याच मुर्ती खरेदीकडे प्राधान्य देण्यात येत असत़े परंतु यंदा गणेशभक्तांमध्ये शाडुच्या मुर्ती खरेदीसाठी प्राधान्य देण्यात येत आह़े
जवळपास 80 टक्के शाडु मातीच्या मुर्तीची बुकिंग झाली असल्याची माहिती या वेळी झवेरी यांच्याकडून देण्यात आली आह़े येत्या काही दिवसांत ही टक्केवारी अधिक वाढणार असल्याचे सांगण्यात येत आह़े पर्यावरणाला महत्व देताना यंदाच्या शाडुच्या गणपतींच्या मुर्ती तयार करतांना अजून एक प्रयोग करण्यात आला आह़े शाडु मातीच्या मुर्ती घडवितांना त्यांच्यात विविध रोपांच्या बिया रुजविण्यात आल्या आह़े जेणे करुन या मुर्तीचे विसजर्न झाल्यावर त्यापासून रोपटे तयार होणार असल्याचे सांगण्यात आल़े त्यामुळे केवळ शाडु मातीचीच मुर्ती नाही तर त्याहून पुढे विचार करीत झाडे लावण्याचाही उद्देश यातून साध्य होणार आह़े
शाडु मातीच्या मुर्ती तयार करीत असताना मोठय़ा प्रमाणात मेहनत घ्यावी लागत असल्याचे मुर्तीकारांकडून सांगण्यात येत आह़े शिवाय यावर रंग देण्यासाठी खर्चही अधिक येत असल्याने पीओपीच्या मुर्तीच्या तुलनेत याची किंमत अधिक असल्याचे मुर्तीकारांकडून सांगण्यात येत आह़े