दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नंदुरबारातील नागरिकांवर आरोग्यसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:59 AM2019-03-13T11:59:51+5:302019-03-13T12:00:00+5:30

नंदुरबार : नळवा रोड भागातील रहिवासी वसाहतींमध्ये नागरिकांच्या कूपनलिकांना फेसयुक्त, पिवळे दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात ...

Nandurbar residents get health check up due to dehydrated water | दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नंदुरबारातील नागरिकांवर आरोग्यसंकट

दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नंदुरबारातील नागरिकांवर आरोग्यसंकट

Next

नंदुरबार : नळवा रोड भागातील रहिवासी वसाहतींमध्ये नागरिकांच्या कूपनलिकांना फेसयुक्त, पिवळे दुर्गंधी युक्त पाणी येत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले़ याबाबत पालिकेने सांडपाण्याच्या पाईपलाईन तपासूनही ही समस्या कायम असून हे पाणी सांडपाण्यातूनच जमिनीत झिरपत असल्याचे भूजल सवैक्षण विभागाचा अंदाज आहे़
नळवा रोड भागातील सोमेश्वर नगर, खंडेराव पार्क, दशरथ नगरी, दगा महाराज कॉलनी यासह विविध ३० रहिवासी वसाहतींमध्ये नागरिकांनी सोयीसाठी खाजगी कूपनलिका करवून घेतल्या आहेत़ या कूपनलिकांद्वारे गेल्या १५ दिवसांपासून या कूपनलिकांना दुर्गंधी युक्त घाण पाणी येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते़ त्यांनी याबाबत पालिका पाणीपुरवठा विभागाकडे माहिती दिली होती़ यानुसार पाणी पुरवठा विभागाने रेल्वे बोगदा ते एकता नगर परिसरातील ड्रेनेज लाईनचे काम सुरु करत साफसफाई केली होती़ यात लिकेजेस काढून गटारी पूर्ववत वाहत्या केल्या होत्या़ यानंतरही दूषित पाण्याचे संकट दूर झालेले नसल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत़ पालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारे दोष नसला तरी कूपनलिकांच्या पाण्यामुळे आजार उद्भवण्याचा संभव आहे़
बहुतांश नागरिक कूपनलिकांचे पाणी घरातील वॉटर प्युरीफायरद्वारे निर्जंतूक करुन घेत असले तरी त्याला येणारी दुर्गंधी कायम असल्याचे सांगत आहेत़ या प्रकाराला वेळीच आळा न घातला गेल्यास आरोग्यसंकट उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्क

Web Title: Nandurbar residents get health check up due to dehydrated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.