नंदुरबार पालिकेत सत्ताधारी व विरोधकांचे देर आये, दुरूस्त आयेची गत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 12:09 PM2018-05-04T12:09:25+5:302018-05-04T12:09:25+5:30
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिका निवडणुकीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधील सुंदोपोसुंदी गेल्या महिन्यात हातघाईवर आली होती. त्यातून निर्माण झालेला राडा संपुर्ण जिल्ह्याने पाहिला. त्यामुळे पालिकेची पुढची सर्वसाधारण सभा कशी होते याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. परंतु दोन्ही गटाचे हात पोळल्याने व देर आये दुरूस्त आये या म्हणीप्रमाणे दोन्ही गटाने सामंजस्याने घेवून गुरुवारची सर्वसाधारण सभा पार पाडली. या सभेत आरोप-प्रत्यारोप झाले, काही विषयांवर गोंधळही झाला. परंतु तो लोकशाही मार्गाने. तेच शहरवासीयांसह सर्वाना अभिप्रेत असून विकासाला ते प्रेरकच असते. यापुढे देखील सत्ताधारी व विरोधकांचे असेच वागणे शहरवासीयांना अभिप्रेत आहे.
पालिका निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकांमध्ये झालेले सार्वजनिक, वैयक्तिक व कौटूंबिक आरोप-प्रत्यारोपामुळे मोठय़ा प्रमाणावर कटूता निर्माण झाली होती. दोन्ही गट एकमेकांवर आरोप करण्याची, एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी सोडत नव्हते. त्याचे प्रतिबिंब पालिकांच्या सर्वसाधारण सभांमध्ये देखील उमटत होते. गेल्या महिन्यात अर्थात 3 एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील राडा सर्वानाच माहिती आहे. सभागृहातील हा राडा थेट रस्त्यावर येवून त्यातून शहरवासीयांना वेठीस धरण्यात आले होते. दोन्ही गटाच्या नगरसेवकांसह कार्यकत्र्याना आरोपी करण्यात आले होते. त्यामुळे गुरुवार, 3 मेच्या सभेकडे सर्वाचे लक्ष होते. आधीच नगराध्यक्षांनी पोलीस विभागाला पत्र देवून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. विरोधी गटाने देखील तशीच मागणी केली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी सभा होती त्या नाटय़गृह परिसराला छावनीचे स्वरूप आले होते. सभेच्या अजेंडय़ावर केवळ पाच विषय होते. त्या विषयांवर चर्चा झाली. काही विषयांवर आरोप-प्रत्यारोप झाला. नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी यावेळी नेहमीच्या भुमिकेला आणि स्वभावाला फाटा देवून आणि थोडी कणखर आणि प्रसंगी समतोल भुमिका घेवून सभा चालवून नेली.
विरोधी गटाचे प्रतोद चारूदत्त कळवणकर यांनी देखील नियमाप्रमाणेच मुद्दयांना हात घातला. इतर विरोधी सदस्यांनीही आक्रमकपणे भुमिका मांडण्याचा प्रय} केला. त्यांचेही म्हणने नगराध्यक्षांनी ऐकुण घेत समाधानकारक उत्तरे दिली. नेहमीप्रमाणे अध्यक्षांच्या डायसजवळ येवून आक्रमकपणे आपली भुमिका मांडण्याचा प्रय} यावेळी झाला नाही. त्यामुळे दोन्ही गटांची सामंजस्याची आणि समजदारीची भुमिका दिसून आली. पत्रकारांना देखील सभागृहात परवाणगी नाकारण्यात आली होती. पीठासीन अधिका:यांना अर्थात नगराध्यक्षांना असलेल्या अधिकारात घेतलेल्या या निर्णयाला विरोधी गटाचे कळवणकर यांनी आक्षेप घेतला परंतु त्यांनीही जास्त हा मुद्दा लावून धरला नाही.
शहर विकासाचा अजेंडा राबवितांना सत्ताधारी गटाला विरोधकांच्या भुमिकेचा, त्यांच्या सुचनांचा आदर करावाच लागणार आहे. गेल्या पाच वर्षात एकतर्फी बहुमत असल्यामुळे पालिकेचे कामकाज एकतर्फीच चालवून घेता आले. परंतु आता विरोधकांची संख्या देखील दोन आकडी असल्यामुळे त्यांनाही सोबत घेवून काम करावे लागणार आहे. सत्ताधारी गटातील काही आक्रमक स्वभावाच्या नगरसेवकांनाही आपला स्वभाव बाजुला ठेवावा लागणार आहे. विरोधी गटातील काही नगरसेवकांनाही केवळ आरोप करायचा म्हणून करायचा ही सवय सोडावी लागणार आहे. जेथे पालिका चुकेल, निर्णय चुकतील, नागरिकांच्या हिताचे ते राहणार नाहीत, एकतर्फी कारभाराचे ते नमुने असतील तर त्या ठिकाणी जरूर आक्रमकपणे आपला निषेध नोंदवावा. परंतु जेथे विकासाचा मुद्दा येईल, सार्वजनिक व नागरिकांचा हिताचा मुद्दा येईल तेथे सहकार्याची भावना ठेवणे अपेक्षीत राहणार आहे.
एकुणच महिनाभरापूर्वी घडलेल्या घटनेचे कटू वातावरण आणि एकमेकांच्या मनातील द्वेशभावना गुरुवारच्या सभेने दूर झाली, यापुढे देखील असेच वातावरण राहून त्यातून शहर विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.