Nandurbar: नागपूरच्या दोघांकडून शहाद्याच्या वृद्धाची ५० लाखांत फसवणूक
By मनोज शेलार | Published: January 4, 2024 02:44 PM2024-01-04T14:44:13+5:302024-01-04T14:44:42+5:30
Nandurbar: नागपूर येथे सदनिकेत गुंतवणूक करून घेण्यास भाग पाडत ती सदनिका परस्पर बँकेत गहाण ठेवून ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर येथील दोन जणांविरूद्ध बुधवारी रात्री शहादा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- मनोज शेलार
नंदुरबार - नागपूर येथे सदनिकेत गुंतवणूक करून घेण्यास भाग पाडत ती सदनिका परस्पर बँकेत गहाण ठेवून ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर येथील दोन जणांविरूद्ध बुधवारी रात्री शहादा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनुसार, फेब्रुवारी २०१८ ते मार्च २०२२ या कालावधीत लोणखेडा (ता. शहादा) येथील हैदरअली कुतुबअली नुरानी (९१) यांना नागपूर येथील फातेमा खुजेमा शफीक (४५) व हसन खुजेमा शफीक (५०) यांनी नागपूर येथे सदनिकेत पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानुसार त्यांनी सदनिका बुक केली. परंतु, तिचा ताबा न देता दोघांनी वर्धा सहकारी बँकेकडे संबंधित सदनिका गहाण ठेवून ५० लाख रुपये उचल घेतली. ज्यावेळी नुरानी यांना ही माहिती मिळाली, त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लागलीच शहादा पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून फातेमा शफीक व हसन शफीक (रा. १४ बैतूल, क्वेटा कॉलनी, लक्कडगंज, नागपूर) यांच्याविरूद्ध शहादा पोलिसांत ५० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील तपास करीत आहेत.