नंदुरबार शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध, शिवसेनेचे (शिंदे गट) वर्चस्व
By मनोज शेलार | Published: April 19, 2023 07:41 PM2023-04-19T19:41:19+5:302023-04-19T19:41:25+5:30
१३ जागांसाठी तेवढेच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
नंदुरबार :नंदुरबार शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची बुधवारी शेवटची मुदत होती. १३ जागांसाठी तेवढेच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. शिवसेना (शिंदे) गटाचे वर्चस्व राहणार आहे.
नंदुरबार येथील शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३ पैकी १३ जागांवर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी रघुवंशी गटाच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केेले. विरोधकांतर्फे कुणीही अर्ज दाखल केले नाहीत.
बिनविरोध झालेल्यांमध्ये बी. के. पाटील, अरुण गजेंद्रसिंह हजारी, प्रभाकर पोपट पाटील, लोटन अमर पाटील, भारत हरबानसिंग राजपूत, पंडित भगवान पाटील, संतोष खंडू पाटील, विलास विठ्ठल पाटील, उद्धव मक्कन पाटील, गोकुळ दामोदर नागरे, नाठ्या टेट्या वळवी, मालतीबाई वसंत देसले, सेजल दीपक पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
प्रामाणिकपणे काम केल्यास विरोधकांना सूचक व अनुमोदक मिळत नाही, हे चित्र यंदाच्या निवडणुकीतून दिसून आल्याचे शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.