रुग्ण संख्येत नंदुरबार तालुका टॉपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:03 PM2020-07-05T12:03:23+5:302020-07-05T12:03:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तीन महिन्यात जिल्ह्यात केवळ दोन हजार स्वॅब घेतले गेले. आता पुढील आठवड्यापासून स्वॅबची संख्या ...

Nandurbar taluka tops in number of patients | रुग्ण संख्येत नंदुरबार तालुका टॉपवर

रुग्ण संख्येत नंदुरबार तालुका टॉपवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तीन महिन्यात जिल्ह्यात केवळ दोन हजार स्वॅब घेतले गेले. आता पुढील आठवड्यापासून स्वॅबची संख्या वाढणार असून स्थानिक ठिकाणीच ते तपासले जाणार आहे. दरम्यान, कोरोना रुग्णाच्या आकडेवारीत नंदुरबार जिल्हा आजही टॉपवर आहे. शहादा दुसऱ्या स्थानी तर तळोदा तिसºया स्थानावर आहे. धडगावमध्ये सुदैवाने अजूनही खाते उघडले गेले नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत १८० रुग्ण आढळून आले असून ८३ जण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात १८ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळून आल्यापासून ४ जुलैपर्यंत तीन ते साडेतीन महिन्यांच्या कालावधीत केवळ दोन हजार स्वॅबची तपासणी केली गेली. याला वेगवेगळे कारणे असले तरी आता स्थानिक ठिकाणीच स्वॅब तपासणी व्हावी यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे स्वॅब घेणे आणि तपासणी करणे याची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे संक्रमणाचा धोका देखील कमी होण्यास मदत होणार आहे.
नंदुरबार टॉपवरच
जिल्ह्यात नंदुरबार शहर व तालुका टॉपर आहे. तब्बल १२० रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पाच जणांचा मृत्यू देखील झाला आहे. तर बरे होण्याचे प्रमाण ५० टक्केपर्यंत आहे. सद्य स्थितीत शहर व तालुक्यातील ५९ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील ५४ जण बरे झाल्याने घरी जाऊ देण्यात आले आहे. तालुक्यातील सर्वाधिक जवळपास १२५९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
अखेर नवापुरात पॉझिटिव्ह...
नवापूर शहर व तालुका गुजरात राज्याच्या सिमेवर असतांना, महामार्ग गेलेला असतांना देखील तालुक्यात कोरोनाने एक अपवाद वगळता शिरकाव केलेला नव्हता. विसरवाडी येथे आढळलेला एक रुग्ण वगळता नवापूर तालुका निल होता. परंतु बाहेरून आलेल्या रुग्णामुळे नवापुरात कोरोनाने शिरकाव केलाच. शुक्रवारी शहरात एक रुग्ण आढळून आला. ही रुग्ण महिला सुरत येथून आलेली असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यात आता सद्य स्थितीत एकच रुग्ण असला तरी ७१ पेक्षा अधीक जणांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत.
एकमेव धडगाव तालुका सुरक्षीत
धडगाव हा एकमेव तालुका कोरोनापासून अलिप्त राहिला आहे. तालुक्यात अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
तालुक्यातील ३६ जणांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत. त्यातील सर्वच स्वॅब हे निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. यापुढेही तालुका कोरोनामुक्त राहावा यासाठी प्रयत्न सुरू असून तालुका प्रशासन प्रयत्नशील आहेत.
मोलगी भागात प्रादुर्भाव
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी सारख्या दुर्गम भागात देखील कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता. परंतु बाहेरून आलेल्या व्यापाºयाने येथे सुरुवात केली. त्यानंतर बाहेरून येणाºया पोलीस कर्मचाऱ्यांना देखील लागण झाली. त्यामुळे मोलगीत एक दोन नव्हते तर सहा कोरोनाबाधीत आढळून आले. सुदैवाने दुर्गम भागातील सामान्य जनतेत त्याचे संक्रमण न झाल्याने मोठा दिलासा मिळाला. परंतु यापुढे देखील बाहेरून आलेल्यांमुळे संक्रमन वाढू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
याउलट अक्कलकुवा शहरात सुरुवातीला आढळलेल्या चार रुग्णा व्यतिरिक्त दुसरे रुग्ण आढळून आलेले नाहीत.
शहादा-तळोदा वरचड
नंदुरबारच्या खालोखाल तळोदा व शहादा तालुक्यांमध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत आहे. तळोद्यात १७ तर शहादा तालुक्यातदेखील २८ रुग्ण आढळून आलेले आहेत. तळोद्यातील ९ रुग्ण बरे झाले असून सहा जण उपचार घेत आहेत. तर शहाद्यात १४ रुग्ण बरे झाले असून ११ जण उपचार घेत आहेत.
२०७० स्वॅब घेतले
जिल्ह्यात आतापर्यंत एकुण २,०७० स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यात १,२५९, शहादा तालुक्यात ३४५, तळोदा तालुक्यात १३४, नवापूर तालुक्यात ७१, अक्कलकुवा तालुक्यात ३२४, धडगाव तालुक्यात ३६ स्वॅब घेण्यात आले. या स्वॅब रिपोर्टपैकी आता १२० रिपोर्टची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यात स्वॅब तपासणीचे प्रमाण कमी असल्यामुळे रुग्ण संख्येचे प्रमाण देखील कमी असल्याचे एकुण चित्र आहे.
पुढील आठवड्यापासून स्थानिक स्तरावरच स्वॅब तपासणी केली जाणार असल्यामुळे स्वॅब घेण्याचे प्रमाण देखील वाढणार आहे.
सद्य स्थितीत जिल्हाबाहेरून येणाºया लोकांमुळेच कोरोनाचा फैलाव होत असल्याचे नंदुरबार, शहादा, तळोदा येथील प्रकारांवरून दिसून येत आहे.

Web Title: Nandurbar taluka tops in number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.