नंदुरबारात तापमानाने गाठली निच्चांकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:36 PM2017-12-26T12:36:14+5:302017-12-26T12:36:22+5:30

Nandurbar temperature reached below | नंदुरबारात तापमानाने गाठली निच्चांकी

नंदुरबारात तापमानाने गाठली निच्चांकी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारातील घटत चाललेल्या तापमानामुळे गारठा वाढू लागला आह़े सोमवारी आतार्पयतच्या ‘सिझन’ मधील सर्वाधिक निच्चांकी म्हणजे 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आह़े त्यामुळे येत्या काळात नंदुरबारातील गारठा अधिक जाणवू लागणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आह़े
नंदुरबारात सर्वसाधारणपणे यंदा गारठा उशिरा जाणवत असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले आह़े त्यामुळे काही अंशी रब्बीच्या पेरण्याही खोळंबल्या होत्या़ परंतु डिसेंबरपासून नंदुरबारात थंडी चांगलीच जाणवू लागली आह़े उत्तरेकडून येणा:या शितलहरींचे प्रमाण वाढल्याने हा गारठा जाणवत असल्याचे मुंबई येथील भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ अजयकुमार यांनी सांगितल़े येत्या काळात या शितलहरींचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यताही त्यांनी या वेळी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली़
नंदुरबार शहरासह ग्रामीण भागात गोठवणारी थंडी जाणवत आह़े त्यामुळे आता ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटू लागल्या आहेत़ यंदा नंदुरबार जिल्ह्यात तळोदा वगळता इतर ठिकाणी पावसाने पाठ फिरवली होती़ त्यामुळे यंदा हिवाळा उशिराने जाणवू लागल्याचे अनेकांचे म्हणणे आह़े थंडी जाणवत असल्याने आता उबरादार कपडय़ांनाही मागणी वाढली आह़े जिल्ह्यातून तसेच परराज्यातून उबदार कपडय़ांचे व्यावसायिक शहरातील बाजारपेठेत दाखल झाले आह़े सुरुवातीला थंडी जाणवत नव्हती परंतु आता काही दिवसांपासून थंडी जाणवत  असल्याने व्यवसायाला चालना मिळाली आह़े
 

Web Title: Nandurbar temperature reached below

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.