नंदुरबारातील बेशिस्त वाहनधारकांकडून वर्षभरात 16 लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:43 PM2018-12-14T12:43:04+5:302018-12-14T12:43:08+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस दलाकडून धडक मोहिम सुरु करण्यात आली़ यांतर्गत गुरुवारी सकाळपासून विनानंबर, तीनसीट ...
नंदुरबार : जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलीस दलाकडून धडक मोहिम सुरु करण्यात आली़ यांतर्गत गुरुवारी सकाळपासून विनानंबर, तीनसीट आणि कागदपत्रे नसलेल्या दुचाकींवर कारवाई करण्यात येऊन बेशिस्तांना समज देण्यात आली़ सर्व 12 पोलीस ठाण्यात गुरुवारी सकाळी एकाचवेळी ही कारवाई सुरु झाली़
नंदुरबारसह शहादा, तळोदा, नवापूर, विसरवाडी, अक्कलकुवा या भागात मोटारसायलकवर गुन्हे करुन गुन्हेगार पसार होत असल्याच्या काही घटना घडल्या होत्या़ त्या वाढू नयेत याची दक्षता घेत जिल्हा पोलीस दलाने गुरुवारी सकाळी सर्व 12 पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार करत विनाक्रमांक असलेल्या दुचाकींची तपासणी सुरु केली़ यादरम्यान बेशिस्तपणे ट्रीपलसीट दुचाकी चालवणारे, वाहन परवाने आणि कागदपत्रे नसलेल्यांची चौकशी करण्यात आली़
या कारवाईनंतर दंड होवू नये यासाठी वाहतूक शाखा, पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचे फोन सातत्याने खणखणत होत़े दिवसभरात किमान 70 विनानंबर व ट्रीपलसीट मोटारसायकलस्वारांवर कारवाई केल्याची माहिती पोलीस अधिका:यांकडून देण्यात आली आह़े कारवाईमुळे दिवसभर दुचाकीस्वारांची गल्लोगल्ली पळापळ सुरु असल्याचे दिसून आले होत़े महिनाभर ही कारवाई सुरु राहणार आह़े शहर वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहनधारकांकडून नियमितपणे कारवाई करण्यात येत़े 1 जानेवारी ते 13 डिसेंबर 2018 या दरम्यान 16 लाख 6 हजार 96 रुपयांच्या दडांची वसूली करण्यात आली आह़े
शहर वाहतूक शाखेने जानेवारी महिन्यात 548 जणांवर केलेल्या कारवाईतून 1 लाख 10 हजार 800 रुपये, फेब्रुवारी महिन्यात 435 जणांकडून 88 हजार 800, मार्च-845 जणांकडून 1 लाख 67 हजार 800, एप्रिल-1 हजार 08 बेशिस्तांकडून 2 लाख 11 हजार, मे- 742 जणांकडून 1 लाख 48 हजार 700, जून- 618 जणांकडून 1 लाख 24 हजार 500, जुलै-457 जणांकडून 91 हजार 100, ऑगस्ट-562 जणांकडून 1 लाख 13 हजार 200, सप्टेंबर-612 जणांकडून 1 लाख 21 हजार 500, ऑक्टोबर 885 जणांकडून 1 लाख 81 हजार 96 हजार, नोव्हेंबर-1 हजार 183 जणांकडून 2 लाख 49 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आह़े सुरु असलेल्या डिसेंबर महिन्यात आजअखेरीस 606 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून करण्यात आली आह़े शहर वाहतूक शाखेकडून बेशिस्त वाहनधारकांकडून नियमितपणे कारवाई करण्यात येत़े 1 जानेवारी ते 13 डिसेंबर 2018 या दरम्यान 16 लाख 6 हजार 96 रुपयांच्या दडांची वसूली करण्यात आली आह़े
शहर वाहतूक शाखेने जानेवारी महिन्यात 548 जणांवर केलेल्या कारवाईतून 1 लाख 10 हजार 800 रुपये, फेब्रुवारी महिन्यात 435 जणांकडून 88 हजार 800, मार्च-845 जणांकडून 1 लाख 67 हजार 800, एप्रिल-1 हजार 08 बेशिस्तांकडून 2 लाख 11 हजार, मे- 742 जणांकडून 1 लाख 48 हजार 700, जून- 618 जणांकडून 1 लाख 24 हजार 500, जुलै-457 जणांकडून 91 हजार 100, ऑगस्ट-562 जणांकडून 1 लाख 13 हजार 200, सप्टेंबर-612 जणांकडून 1 लाख 21 हजार 500, ऑक्टोबर 885 जणांकडून 1 लाख 81 हजार 96 हजार, नोव्हेंबर-1 हजार 183 जणांकडून 2 लाख 49 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आह़े सुरु असलेल्या डिसेंबर महिन्यात आजअखेरीस 606 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून करण्यात आली आह़े