नंदुरबारला पाणीटंचाईमुळे कापूस लागवड लांबणीवर

By admin | Published: June 3, 2017 02:53 PM2017-06-03T14:53:47+5:302017-06-03T14:53:47+5:30

येथे पाण्याची पातळी कमालीची खालावली असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आह़े

Nandurbar water shortage due to shortage of cotton | नंदुरबारला पाणीटंचाईमुळे कापूस लागवड लांबणीवर

नंदुरबारला पाणीटंचाईमुळे कापूस लागवड लांबणीवर

Next

ऑनलाईन लोकमत

बोरद/लहान शहादे, जि. नंदुरबार, दि. 3 - : तळोदा तालुक्यातील बोरद व मोड तसेच नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे येथे पाण्याची पातळी कमालीची खालावली असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आह़े त्यामुळे शेतक:यांनी कापूस लागवडही लांबणीवर पडली आह़े
तळोदा तालुक्यातील बोरद तसेच मोड परिसरातील शेतक:यांनी कापसाची लागवड लांबणीवर टाकली आह़े त्यामुळे याचा परिणाम म्हणून दिवाळीत येणारे कापसाच्या पिकात मोठय़ा प्रमाणात घट होणार असल्याचा अंदाज परिसरातील जाणकार शेतक:यांकडून वर्तविण्यात येत आह़े
याचा परिणामी शेतक:यांच्या उत्पन्नावरही होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े
दरवर्षी 15 ते 20 मे दरम्यान कापसाची लागवड करण्यात येत असत़े परंतु आता जून लागल्यावरही लागवड करण्यात आलेली नाही़ पाण्याचे मुबलक प्रमाण नसल्याने बोरद तसेच लहान शहादे येथे शेतक:यांनी कापसाची लागवड लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आह़े बोरद येथे पाण्याची पातळी मोठय़ा प्रमाणात खालावली असल्याने तेथील कृषीपंप पूर्ण क्षमतेने पाणीही ओढत नसल्यामुळे परिणामी पीकांना पाणी मिळण्यास अडचण होत आह़े त्यामुळे यातून इतर पिक जळण्याचे प्रकारही वाढत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आल़े परिसरात पाणीटंचाई असल्याने शेतात लावण्यात आलेली पपई, केळी आदी पिके करपू लागली असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आल़े त्यामुळे परिसरातील शेतकरी कापसाची लागवड करुन जोखील घेण्यास तयार नाही़ हवामान खात्याकडून लवकर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आह़े परंतु हवामान खात्याचा अंदाज नेहमीच खरा होतोच                  असे नसल्याचे मत काही  शेतक:यांकडून व्यक्त करण्यात आले आह़े त्यामुळे कापूस लागवड केली आणि पावसाने हुलकावणी दिल्यास भविष्यात होणा:या पिकाच्या नुकसानीच्या भितीने शेतकरी कापूस लागवडीस धजावत नसल्याचे चित्र आह़े

Web Title: Nandurbar water shortage due to shortage of cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.