Nandurbar: पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेली, मनस्तापातून पतीने उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन
By मनोज शेलार | Updated: November 9, 2023 18:51 IST2023-11-09T18:50:14+5:302023-11-09T18:51:00+5:30
Nandurbar: पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याच्या मनस्तापातून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना कोंढावळ, ता. शहादा येथे घडली. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सारंगखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nandurbar: पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेली, मनस्तापातून पतीने उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन
- मनोज शेलार
नंदुरबार - पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेल्याच्या मनस्तापातून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना कोंढावळ, ता. शहादा येथे घडली. याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सारंगखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवन अभिमन माळी (३५, रा. कोंढावळ, ता. शहादा) असे मयताचे नाव आहे. तर मीनाबाई जीवन माळी (३०, रा. कोंढावळ) व किरण भगवान माळी (३५, रा. कापडणे, ता. धुळे) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिस सूत्रांनुसार, जीवन माळी यांची पत्नी मीनाबाई या किरण यांच्यासोबत २ नोव्हेंबर रोजी पळून गेली होती. त्यामुळे जीवन यांनी मनस्ताप करून घेतला होता. त्यातूनच त्यांनी कोंढावळ येथील शेताच्या खळ्यात गळफास लावून घेतला. याबाबत मयताचे भाऊ सुभाष माळी यांनी फिर्याद दिल्याने मीनाबाई व किरण यांच्याविरुद्ध बुधवारी रात्री आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सारंगखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.