नंदुरबार जिल्हा परिषदेत चक्क कर्मचा-यांची झाली परीक्षा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:18 PM2018-03-13T13:18:37+5:302018-03-13T13:18:37+5:30
संगणकीय ज्ञानाची घेतली गेली ऑनलाईन परीक्षा
मनोज शेलार ।
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 13 : सर्वत्र संगणकीकरणाचे युग असतांना जिल्हा परिषद कर्मचारी त्यात मागे नको, यासाठी संगणकाचे आणि इंटरनेटचे ज्ञान किती कर्मचा:यांना आहे यासाठी घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेत 50 टक्के कर्मचारी नापास झाल्याची स्पष्ट झाले आहे. आता या कर्मचा:यांबाबत जिल्हा परिषद प्रशासन काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागून आहे.
शासनाने यापूर्वी सर्वच कर्मचा:यांना एचटीसीआयटी ही संगणकीय ज्ञानाची परीक्षा पास होणे सक्तीचे केले होते. त्यानुसार अनेक कर्मचा:यांनी ही परीक्षा पास होऊन त्याचे सर्टीफिकेट त्या त्या विभाग प्रमुखांकडे जमा देखील केले होते. याशिवाय आता शासकीय सेवेत लागतांना एचटीसीआयटी ही संगणकीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहेच. परंतु असे असतांनाही अनेक कर्मचा:यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान देखील नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. परिणामी ज्या कर्मचा:याला थोडेफार ज्ञान आहे त्याच्यावरच संगणकीय कामाची सर्व जबाबदारी सोपवून इतर कर्मचारी नामनिराळे राहत असतात. याबाबतच्या तक्रारी जिल्हा परिषदेत वाढल्या होत्या. ही बाब लक्षात घेता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सर्वच कर्मचा:यांची संगणकीय ज्ञानाची परीक्षा घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार रविवारी घेतलेल्या परीक्षेत 50 टक्के कर्मचारी नापास झाले आहेत.
सर्वच विभागाला अनिवार्य
मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी याबाबत 15 दिवसांपूर्वीच एक परिपत्रक काढून कर्मचा:यांना याबाबत सुचीत केले होते. सर्वच विभागातील कर्मचा:यांसाठी ही परीक्षा अनिवार्य होती. एकुण 180 पेक्षा अधीक कर्मचा:यांनी ही परीक्षा दिली.
अशी होती परीक्षा
रवीवार, 11 रोजी झालेली ही परीक्षा ऑनलाईन होती. एक तासांचा वेळ त्यासाठी देण्यात आला होता. बहुपर्यायी असलेल्या या परीक्षेत एकुण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातून किमान 25 गुण मिळविणारे कर्मचारी हे उत्तीर्ण समजण्यात आले आहेत. सोमवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हा परिषदेत या परीक्षेचा निकाल लागला तेंव्हा निम्मे कर्मचारी अर्थात जवळपास 90 ते 95 कर्मचारी अनुत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पेपरलेसच्या दिशेने
जिल्हा परिषदेचे कामकाज हे पेपरलेसच्या दिशेने नेण्याचा प्रय} प्रशासनाचा आहे. त्यासाठी सर्वच कर्मचा:यांच्या टेबलवर संगणक देण्याचाही प्रय} आहे. परंतु अनेक कर्मचा:यांच्या टेबलावरील संगणक धुळखात पडून आहेत. फाईली, कागदपत्रे, माहितीची देवाण-घेवाण या सर्व बाबी या ऑनलाईन आणि ई-मेलद्वारेच झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा आहे. यामुळे कामकाजात वेग येईल व वेळेवर कामकाज होईल हा उद्देश त्यामागे आहे.
कर्मचा:यांची उत्सूकता
परीक्षा दिलेल्या सर्वच कर्मचा:यांची उत्सूकता निकालाबाबत ताणली गेली होती. अवघ्या एका दिवसात अर्थात सोमवारी सायंकाळी पाच वाजता निकाल जाहीर करण्यात आला. अर्थात परीक्षा दिलेल्या कर्मचा:यांची लिस्ट व त्यांना मिळालेल गुण जाहीर करण्यात आले. ते पहाण्यासाठी एकच गर्दी केली होती.