नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत शिक्षण आणि पाण्यावरून अधिक:यांची खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:52 AM2017-12-01T11:52:18+5:302017-12-01T11:52:28+5:30

Nandurbar Zilla Parishad Standing Committee meeting; More about education and water: The slogan | नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत शिक्षण आणि पाण्यावरून अधिक:यांची खरडपट्टी

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत शिक्षण आणि पाण्यावरून अधिक:यांची खरडपट्टी

Next
ठळक मुद्देशाळा खोल्यांमध्ये चारा भरल्याचे वास्तव सातपुडय़ातील मांजीपाडा जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांमध्ये चारा भरून ठेवला आह़े त्यामुळे तेथे शिक्षक आणि विद्यार्थी यांची स्थिती काय, असा प्रश्न सदस्य रतन पाडवी यांनी उपस्थित केला होता़ यावर प्राथमिक शिक्षणधिकारी अरूण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमुळे विद्याथ्र्याचे थांबलेले शिक्षण आणि पडून असलेल्या विंधन विहिरी या दोन विषयांमुळे जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा वादळी ठरली़ सभेत स्थायी समिती सदस्यांनी अधिका:यांची खरडपट्टी काढत योग्य त्या कारवाई करण्याच्या सूचना केल्या़ 
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा गुरूवारी झाली़ सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी़एम़ मोहन, महिला व बालकल्याण समिती सभापती लताबाई पाडवी, आरोग्य व शिक्षण समिती सभापती हिराबाई पाडवी, समितीचे सदस्य रतन पाडवी, सिताराम राऊत, अभिजीत पाटील, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सारिका बारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी अरूण पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ़ राहुल पाटील, आरोग्याधिकारी डॉ़ शिवाजी राठोड, कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वाडेंकर यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होत़े 
सभेचे प्रास्ताविका सारिका बारी यांनी केल़े यानंतर अद्वैत सांगळे यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ सभेत चार ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या सभेचे इतिवृत्ताचे वाचन करण्यात आल़े त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघुसिंचन विभाग, शिक्षण समिती, प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग, आरोग्य समिती, बांधकाम समिती, कृषी, समाजकल्याण, महिला व बालकल्याण समिती, अर्थ, ग्रामीण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, जिल्हा ग्रामविकास निधी, यासह विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात येऊन विविध विभागांसाठी मंजूर निधी, चालू कामे, कर्मचा:यांच्या रजा, अधिकारी व शिक्षकांच्या बदल्या यांच्यावर चर्चा करण्यात आली़ 
 

Web Title: Nandurbar Zilla Parishad Standing Committee meeting; More about education and water: The slogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.