नंदुरबारात पुढील आठवडाही उष्णतेचाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:43 PM2018-10-21T12:43:57+5:302018-10-21T12:44:02+5:30
नागरिक बेजार : आद्रतेने फोडला घाम, ऑक्टोबर ‘हिट’चा तडाखा वाढणार
नंदुरबार : ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून नंदुरबारातील तापमानात सातत्याने वाढ होत आह़े तापमान 36 ते 38 अंशावर स्थिर आह़े हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवडासुध्दा उष्णतेचाच ठरणार असल्याचे सांगण्यात येत आह़े
संपूर्ण नंदुरबार जिल्हा यंदा दुष्काळाच्या छायेत आह़े परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आह़े त्यातच यंदा पजर्न्यमानही अत्यंल्प होत़े अवघे 67 टक्के पाऊस झाल्याने जमिनीत पाणीदेखील मुरले नाही़ परतीच्या पावसावर सर्व भिस्त असताना प्रत्यक्षात नैऋृत्य मान्सून वारे उत्तर महाराष्ट्रात फिरकलेच नसल्याने साहजिकच पावसाअभावी सप्टेंबर महिनाही कोरडाच गेला होता़ या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यात उष्ण व कोरडे हवामान निर्माण झालेले आह़े परिणामी दिवसाच्या तापमानात वाढ होतेय तर, रात्री आद्रता वाढतेय़
आद्रतेने फोडला घाम
नंदुरबार शहराच्या तापमानात वाढ होत असताना दुसरीकडे आद्रतेतही रोज 2 ते 3 टक्क्यांनी वाढ होत आह़े शनिवारी वातावरणात तब्बल 33 टक्के इतकी आद्रता नोंदविण्यात आलेली आह़े त्यामुळे साहजिकच नंदुरबारकर दुपारी तसेच रात्रीदेखील घामोघाम होत असल्याचे सांगण्यात येत आह़े
ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच नंदुरबार शहराचे तापमान साधारणत: 35 अंशार्पयत स्थिर होत़े यात 1 ते 2 अंशाने वाढ होऊन सध्या तापमान 36 ते 38 अशांर्पयत जावून पोहचले आह़े पुढील आठवडय़ात अजून 1 अंशाने वाढ होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आह़े
ढगाळ हवामान कायम
शनिवारी दुपारी कडक उन्ह तर काही काळ ढगाळ हवामान अशी स्थिती निर्माण झालेली होती़ ढगाळ हवामान असले तरी दिवसभर व रात्रीही उकाडा कायम होता़ दिवसभर उष्ण व कोरडे हवामान असल्याने उन्हाळ्यासारखी स्थिती निर्माण झालेली आह़े नंदुरबारकरांना ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागत असून पुढील आठवडाही वातावरण उष्ण राहणार असल्याने याचा फटका पिकांनाही बसणार असल्याचे स्पष्ट आह़े
थंडीतही उष्णतेचा प्रभाव
यंदा सर्वच जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पावसाची नोंद झालेली आह़े यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात पाणी मुरलेले नाही़ परिणामी उष्ण लहरींचा प्रभाव जास्त राहणार आह़े साधारणत डिसेंबरपासून हिवाळ्याला सुरुवात होत असत़े परंतु यंदाचा हिवाळा उशिरा सुरु होणार असून त्यातही उष्णतेचा प्रभाव अधिक राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आह़े वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्यांना याची झळ पोहचत असून सर्व वयोगटातील नागरीक यामुळे प्रभावित होत आह़े जिल्ह्याला परतीच्या पावसाकडून मोठय़ा अपेक्षा होत्या़ परंतु प्रत्यक्षात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असल्याचे दिसून येत आह़े रविवार - 36 अंश सेल्शिअस आद्रता 37 टक्के, सोमवार - 35 अंश सेल्शिअस आद्रता 39 टक्के, मंगळवार - 37 अंश सेल्शिअस आद्रता 32 टक्के, बुधवार - 36 अंश सेल्शिअस आद्रता 41 टक्के, गुरुवार - 38 अंश सेल्शिअस आद्रता 43 टक्के, शुक्रवार- 36 अंश सेल्शिअस आद्रता 42 टक्के, शनिवार- 37 अंश सेल्शिअस आद्रता 42 टक्क़े