एसटी संपामुळे नंदुरबारातील 540 बसफे-या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:11 PM2018-06-09T13:11:38+5:302018-06-09T13:11:38+5:30
नंदुरबारात उत्स्फूर्त प्रतिसाद : नवापूर वगळता सर्व आगारातील बसफे:या झाल्या प्रभावित
नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात आलेली पगारवाढ एकतर्फी असून त्यात, कर्मचा:यांना विश्वासात घेतले गेले नसल्याने राज्यभरात शुक्रवारपासून एसटी कर्मचा:यांनी संप पुकारला़ त्याला नवापूर वगळता सर्व आगारांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला परंतु यातून प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली़ जिल्हाभरात एकूण 540 बसफे:या रद्द करण्यात आल्या होत्या़ यातून महामंडळाचे किमान 20 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आह़े
नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा, आगारात 100 टक्के संप पाळण्यात आला़ अनेक ठिकाणी मोठय़ा संख्येने पोलिसांचा फौजफाटा मागविण्यात आला होता़ किरकोळ वाद वगळता कर्मचा:यांकडून शांततेत बंद पाळण्यात आला़ दरम्यान, सकाळी नंदुरबार आगारातून औरंगाबाद, पंढरपूर बसफे:या वगळता इतर सर्व बसफे:या रद्द करण्यात आल्या आहेत़ नंदुरबार आगरात एकूण 97 बसफे:यांपैकी केवळ 13 बसफे:या झाल्या असून 84 बसफे:या रद्द करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख नीलेश गावीत यांनी दिली़ एकूण 10 हजार 788 किमीच्या बसफे:या रद्द झाल्याने यातून किमान 6 लाख रुपयांचा आर्थिक तोटा नंदुरबार आगाराला सहन करावा लागणार असल्याचा अंदाज असून एकूण साडेसहाशे कर्मचारी संपात सहभागी होत़े शहादा आगरातील एकूण 28 हजार किमीच्या एकूण 262 बसफे:या रद्द करण्यात आल्या असून त्यात किमान 9 लाखांचे नुकसान झाला आह़े शहादा आगारातील 438 कर्मचारी संपात सहभागी झाले होत़े अक्कलकुवा आगराच्या सर्वच्या सर्व 11 हजार 524 किमीच्या 194 बसफे:या रद्द झाल्या होत्या़ आगाराला यामुळे 4 ते 5 लाखांचा तोटा सहन करावा लागणार आह़े आगारातील 170 कर्मचारी संपात सहभागी होत़ेशहादा आगारातून सकाळी एकही बस सोडण्यात आली नाही़ येथे सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने वाढीव पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता़ आगारप्रमुखांनी पोलीस बंदोबस्तात बसफे:या सोडण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यात त्यांना यश मिळवता आले नाही़ आंदोनकर्ते आक्रमक झाल्याने अखेरीस बसफे:या रद्द करण्यात आल्या होत्या़नंदुरबार आगारात औरंगाबाद व पंढरपूर वगळता इतर सर्व बसफे:या रद्द करण्यात आल्या होत्या़ आगारात मोठय़ा संख्येने एसटी कर्मचारी जमल्याने काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होत़े यावेळी पोलीस अधिकारी व एसटी कर्मचा:यांमध्ये बाचाबाचीसुध्दा झाली़
एसटी कर्मचारी सकाळी पाच वाजेपासून बस आगारात दाखल झाले होत़े यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देत बेसिक वेतनात वाढ करण्यात यावी अशी मागणी करीत होत़े एसटी कर्मचा:यांनी बसस्थानकावरील ‘कंट्रोल रुम’ला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी़टी़ बि:हाडे व एसटी कर्मचा:यांमध्ये बाचाबाची झाली़ तोडफोड होऊन नये म्हणून बि:हाडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बसस्थानकावर लावण्यात आलेल्या बसेस् वर्कशॉप परिसरात घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या़ परिस्थिती नियंत्रणात येईर्पयत पोलीस कर्मचारी तसेच अधिकारी आगारातच तळ ठोकून होत़े