नंदुरबारातील वेडसर ‘विरू’ने आणले सर्वानाच जेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:21 PM2018-04-02T12:21:30+5:302018-04-02T12:21:30+5:30

Nandurbar's cracked 'Viru' brings everything to Jericho | नंदुरबारातील वेडसर ‘विरू’ने आणले सर्वानाच जेरीस

नंदुरबारातील वेडसर ‘विरू’ने आणले सर्वानाच जेरीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शोले चित्रपटातील विरू स्टाईल स्टंट करणा:या एका वेडसर युवकाने नागरिकांसह पोलिसांना चांगलेच जेरीस आणल्याची घटना रविवारी दुपारी महाराष्ट्र व्यायाम शाळा चौकात घडली. अखेर झाडावरून खाली पडल्याने वेडसर युवक पोलिसांच्या हाती लागला. त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास कडकडीत ऊन पडले होते. सुटीचा दिवस असल्यामुळे महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात फारशी वर्दळही नव्हती. ती संधी साधत परिसरात फिरणारा एक वेडसर तरुण थेट पिंपळाच्या झाडावर थेट शेंडय़ार्पयत चढला. चढून तर गेला, परंतु त्याला उतरता येत नसल्यामुळे तो ओरडू लागला. त्यामुळे नागरिकांचे लक्ष त्याच्याकडे गेले. बारीक  फांद्यावर जावून तो कधी लोंबकळू लागला तर कधी पडण्याचा बहाणा करू लागला. एव्हाना त्या परिसरात गर्दी जमली. नागरिकांनी त्याला खाली उतरण्याचे आवाहन केले. परंतु   त्याला उतरता येत नसल्यामुळे तो अडकला. काहींनी पोलिसांना पाचारण केले. 
पोलिसांनीही त्याला खाली उतरविण्यासाठी प्रय} सुरू केले. काही युवकही झाडावर आणि परिसरातील घरांवर चढून त्याला खाली येण्यास सांगत होते. परंतु काहीही उपयोग होत नव्हता. खाली पडीत घरे आणि सॉ-मिल होती.     सॉ-मिलच्या लाकडांमध्ये पडला तर त्याला गंभीर ईजा होण्याची      शक्यता होती. अशा वेळी सर्वजण आपल्या परिने प्रय} करू लागले. अशातच त्याचा तोल जावून तो एका पडक्या कौलारू छताच्या घरावर पडला. छत तोडून तो थेट खाली पडला. घराचे दरवाजे बंद असल्यामुळे पुन्हा तो कसेतरी करून छतावर चढला. 
गर्दी आणि पोलीस पाहून तो खाली उतरून पळू लागला असता जवळच असलेल्या हातपंपाजवळ पुन्हा तो पडला. ती संधी साधून नागरिकांनी त्याला पकडले. त्याला ब:याच ठिकाणी खरचटले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
या प्रकारामुळे मात्र, एक ते दीड तास नागरिकांची आणि   पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली होती.    

Web Title: Nandurbar's cracked 'Viru' brings everything to Jericho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.