नंदुरबारच्या लाल मिरची उद्योगाला आता पिवळ्या हळदीची जोड
By admin | Published: April 24, 2017 01:47 PM2017-04-24T13:47:32+5:302017-04-24T13:47:32+5:30
नंदुरबारात आता मिरची पावडरच्या लालीला हळदीच्या पिवळ्या रंगाची जोड मिळाल्याने जिल्ह्यात मसाला उद्योगाला तेजी आली आहे.
ऑनलाईन लोकमत विशेष /रमाकांत पाटील
नंदुरबार, दि.24- मिरचीसाठी राज्यात सर्वदूर परिचित असलेल्या नंदुरबारात आता हळद उत्पादनालाही चालना मिळत असून मिरची पावडरच्या लालीला हळदीच्या पिवळ्या रंगाची जोड मिळाल्याने जिल्ह्यात मसाला उद्योगाला तेजी आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी मिरचीचे प्रचंड उत्पादन घेतले जात होते. त्यामुळे हंगामात येथील बाजार समितीत रोज जवळपास पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची विक्रीसाठी येत होती. ही मिरची व्यापारी खरेदी करून ते वाळविण्यासाठी शहराबाहेरील पथारीवर टाकत होते. त्यामुळे शहरात प्रवेश करताच प्रत्येकाला शेकडो एकर परिसरातील लालजर्द पथा:या सर्वानाच आकर्षीत करीत असे. त्यावरूनच नंदुरबारची ओळख मिरचीचे शहर म्हणून परिचीत झाले होते. पण गेल्या दहा वर्षापासून विविध कारणांनी मिरचीचे उत्पादन कमी झाले. सहाजिकच येथील मिरची उद्योजकांना सध्या बाहेरून मिरची आणावी लागते. मिरची उद्योगाची ही घसरण सुरू असतांनाच त्याला जोड आता हळदीची मिळत आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत. यावर्षी देखील एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात हळदीची लागवड झाली होती. हळदीला स्थानिक स्तरावर पूर्वी बाजारपेठ नसल्याने शेतक:यांचे हाल होत होते. त्याला पर्याय म्हणून काही मिरची उद्योजकांनी मिरची बरोबरच हळद पावडरही तयार करण्याचा उद्योग सुरू केला. शेतातून हळद काढल्यानंतर त्याला ‘बॉईल’ करण्याची प्रक्रिया अवघड असते. ही प्रक्रिया जिल्ह्यात काही ठिकाणी शेतक:यांनी एकत्र येवून सुरू केली. एक-दोन उद्योजकांनीही पुढाकार घेवून त्याला व्यापक स्वरूप दिले. त्यामुळे स्थानिक स्तरावरच हळदीची खरेदी होऊन त्याची पावडर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नंदुरबार शहरात सध्या काही मिरची उद्योजक हळद पावडर बनवून ते बाहेर विक्री करतात. एका उद्योजकाने या प्रकल्पाला व्यापकता दिली आहे. त्या उद्योजकाकडे दरवर्षी साधारणत: सात हजार क्विंटलपेक्षा अधीक हळद शेतक:यांकडून खरेदी करून त्याची पावडर बनवून ती मिरची पावडर बरोबरच देशभरात पाठविली जात आहे. या उद्योगामुळे हळद उत्पादक शेतक:यांनाही प्रोत्साहन मिळाले आहे.
एक हजार क्विंटलपेक्षा जास्त हळद पावडरची निर्मिती
जिल्ह्यातील काही शेतकरी हळद बॉईल करून ती सांगली बाजारपेठेत विक्रीला नेतात. तर काही शेतकरी स्थानिक व्यापा:यांकडेच विक्री करतात. व्यापा:यांनीही हळद पावडर उत्पादनाला सुरुवात केल्याने दरवर्षी जवळपास एक हजार क्विंटलपेक्षा जास्त पावडरची निर्मिती करून ते देशभरात विक्रीला पाठवित असल्याची माहिती उद्योजक सुनील अग्रवाल यांनी दिली.