बालकामगार प्रथेविरुद्ध नंदुरबारात स्वाक्षरी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:31 PM2019-12-03T12:31:42+5:302019-12-03T12:31:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बालकांना कुठल्याही कामावर लावण्याची परवानगी नसताना जिल्ह्यात विविध उद्योग धंदे व कामाच्या ठिकाणी बाल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बालकांना कुठल्याही कामावर लावण्याची परवानगी नसताना जिल्ह्यात विविध उद्योग धंदे व कामाच्या ठिकाणी बाल कामगार आढळून येतात. अशा बालकांची सुटका व या प्रथेलाच विरोध दर्शविण्यासाठी नंदुरबार बसस्थानकावर स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली.
जिल्ह्यातील हॉटेल, दुकाने, बाधकाम व विटभट्टी अशा ठिकाणी बालकामगार दिसून येतात. बालकामगार ठेवणे ही बाब कायद्याने गुन्हा असतानाही काही मालक, ठेकेदारांमार्फत कमी वयातील मुलांकडून काम करुन घेण्याची प्रथा आहे. या प्रथेवर नियंत्रण आणण्यासाठी बालदिनानिमित्त विशेष मोहिम आखण्यात असून मालक व पालकांमध्ये जनजागृती करीत बालकांना कामावर न ठेवण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. त्यात बालकामगार प्रथेविरुद्ध स्वाक्षरी मोहीम देखील राबविण्यात येत आहे. त्यानुसार नंदुरबार बसस्थानकावर देखील स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी आगार प्रमुख मनोज पवार, संजय कुलकर्णी, प्रविण पाटील, भास्कर बोरसे, महेश वराडे, भरत गवळे, बिपीन पाटील आदी उपस्थित होते.