गोमाई नदीपात्रात नांगरटीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:30 PM2019-06-30T12:30:28+5:302019-06-30T12:30:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील काही भागात मलोणी ज्ॉकवेल येथून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र तेथे असलेल्या कूपनलिकेच्या पाण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील काही भागात मलोणी ज्ॉकवेल येथून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र तेथे असलेल्या कूपनलिकेच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे शहादा नगरपालिकेने गोमाई नदीपात्रात नांगरटीचा उपक्रम सुरू केला आहे.
शहरातील काही भागात मलोणी ज्ॉकवेल येथून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र काही वर्षापासून पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे तेथे असलेल्या कूपनलिकांच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे पालिकेतर्फे गोमाई नदीपात्रात नांगरटीचे काम सुरू करण्यात आले. नांगरटीमुळे नदीपात्रात पाण्याचा निचरा होऊन कूपनलिकेची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल व भविष्यात पाणीटंचाईवर मात करता येणे शक्य होईल. त्यासाठी पालिकेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या शुभारंभाला नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, काँग्रेसचे गटनेते मकरंद पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ, पाणीपुरवठा सभापती संगीता मंदील, नगरसेवक संदीप पाटील, संजू साठे, परेश पवार, नगरसेवक-नगरसेविका, पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संदीप चौधरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.