कलाल समाजाच्या एकत्रिकरणाच्या उद्देशाने नाशिक ते तळोदा सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:25 PM2017-11-06T12:25:50+5:302017-11-06T12:25:50+5:30
मिरवणूक काढून समाज बांधवांचे स्वागत
Next
ल कमत न्यूज नेटवर्कआमलाड : क्षत्रिय कलाल समाजाच्या एकत्रिकरणाच्या उद्देशाने उत्तर महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने नाशिक ते तळोदा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीचा तळोदा शहरात समारोप करण्यात आला. या वेळी कलाल समाजाच्या वतीने मिरवणूक काढून या सायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले. नाशिक येथून 26 ऑक्टोबरला रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. या रॅलीचा मार्ग पिंपळगाव, चांदवड, मालेगाव, आर्वी, धुळे, शिरपूर, शहादामार्गे तळोदा येथे पोहोचल्यावर गणपती गल्लीतील कलाल समाजवाडी येथे स्वागत करून रॅलीचा समारोप करण्यात आला होता. शहरात आल्यानंतर समाजाचे अध्यक्ष संजय कलाल यांनी सप}ीक या सायकल रॅलीची आरती ओवाळून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व नंतर संपूर्ण तळोदा शहरातून वाजत-गाजत या सायकल रॅलीची मिरवणूक काढून रॅलीमध्ये भाग घेतलेल्या समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गणपती गल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिरपूर येथील समाजाचे अध्यक्ष जगदीश कलाल उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र कलाल समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ कलाल, ज्येष्ठ सल्लागार ए.व्ही. कलाल, कलाल समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा भारतीबाई कलाल, व नंदुरबार येथील पी.एस.आय. पदमा कलाल, नाशिक येथील विभागीय आयुक्त राजेंद्र कलाल, प्रदीप कलाल, राहुल सोनवणे व समाज बांधव उपस्थित होते. या वेळी नाशिक येथील समाज कल्याण विभागाचे विभागीय आयुक्त राजेंद्र कलाल म्हणाले की, दीड महिन्यांपूर्वी मी आमच्या व्हाट्सअप ग्रुपवर सायकल रॅलीचा विचार मांडला व त्याला ग्रुपमध्ये असलेल्या समाज बांधवांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला व लगेच आम्ही या रॅलीच्या नियोजनासाठी कामाला लागलो. समाज बांधवांनी उत्साह दाखवून कलाल समाजाच्या एकत्रीकरणाच्या उद्देशाने व एक मोठी समाजाची शक्ती यातून दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. प्रदीप बागुल म्हणाले की, आम्ही दररोज शंभर किलोमीटर सायकलचा प्रवास करायचो. कलाल समाजात एकत्रिकरणाची मोठी शक्ती आहे व ही शक्ती सायकल रॅलीतून दिसून आली. जगदीश कलाल म्हणाले की, सायकल रॅलीची संकल्पना अत्यंत चांगली असून समाजातील लोकांना एकत्र करून विचारांचे आदान प्रदान करता आले. समाजाने एकजूट होऊन एक संघटनाच निर्माण झाली पाहिजे. सायकल रॅलीमुळे आपल्या समाजात एक चेतना निर्माण झाल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचसलन अक्षय कलाल यांनी तर आभार संजय कलाल यांनी मानले. कार्यक्रमासाठी तळोदा कलाल समाज बांधव व नवयुवक समाज मंडळ यानी परिश्रम घेतले.