शहाद्याच्या सारस्वताचा लेखणीला राष्ट्रीय आयाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:44 AM2019-09-01T11:44:32+5:302019-09-01T11:44:38+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : साने गुरुजी, विनोबा भावे आणि म.गांधींच्या साहित्यावर सखोल अभ्यास करणारे गांधीवादी ...
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : साने गुरुजी, विनोबा भावे आणि म.गांधींच्या साहित्यावर सखोल अभ्यास करणारे गांधीवादी साहित्यिक डॉ.विश्वास पाटील यांच्या ‘कस्तूरी परिमल’ या ग्रंथांचे भारत सरकारच्या सुचना व प्रसारन विभागाने प्रकाशन केले आहे. नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे. या प्रकाशनामुळे शहाद्यातील सारस्वताच्या लेखणीला राष्ट्रीय आयाम मिळाला आहे.
म.गांधींच्या सहचारिणी कस्तूरबा गांधी यांचा जीवनपटही गांधींइतकाच मोलाचा आहे. मात्र, त्यांच्या संदर्भात फारसे कुठे लिहिले गेले नाही. गिरिराज किशोर यांचा ‘बा’ हा ग्रंथ वगळता इतर कुठलेही साहित्य कस्तुरबा गांधी यांच्या संदर्भात सापडत नाही. या पाश्र्वभुमीवर डॉ.विश्वास पाटील यांनी गांधी आणि विनोबा भावें संदर्भातील संशोधनात्मक लेखन करीत असतांना त्यांनी कस्तुरबा गांधी यांच्या जीवनपटासंदर्भात लेखन केले. सुरुवातीला ‘कस्तूरी गंध’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याचे प्रकाशान जळगाव येथील गांधी तिर्थने केले होते. त्यासाठी म.गांधी यांचे नातू अरुण गांधी व पणतू तुषार गांधी हे प्रकाशनासाठी आले होते.
या ग्रंथाच्या प्रकाशनानंतर त्याची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली. त्याची दखल भारत सरकारच्या सुचना व प्रसारण मंत्रालयाने घेतली आणि डॉ.विश्वास पाटील यांना कस्तूरबा संदर्भात चरित्र ग्रंथ लिहिण्याचे सांगितले. त्यानुसार डॉ.विश्वास पाटील यांनी ‘कस्तूरी परिमल’ हा चरित्रपर कादंबरी ग्रंथ लिहिला. त्याचे प्रकाशन भारत सरकारच्या सुचनाप्रकाशन विभागाने केले आहे.
या ग्रंथाचे नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत प्रकाशन झाले. सुमारे सव्वादोनशे पानांचा हा ग्रंथ असून त्यात कस्तूरबांचा म.गांधींसोबत ‘मोहन ते महात्मा’ बनण्यार्पयतचा प्रवासात कस्तूरबा एक सहचारिणी व धर्मप}ी म्हणून काय भुमिका राहिली आहे त्याचा जीवनप्रवासाचा उलगडा आहे.
रचनात्मक कार्याचा प्रवास.. कस्तूरी परिमल या ग्रंथात कस्तूरबांचा आश्रमातील, स्वातंत्र्य लढय़ातील आणि तुरुंगातील जीवनाचा प्रवास मांडला आहे. त्यांच्या रचनात्मक कार्याची दखल या ग्रंथात घेण्यात आली आहे. कस्तूरबांचा गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण अफ्रिका यासह भारतातील विविध भागात म.गांधींसोबतचा प्रवास वर्णन त्यात मांडले आहे. त्या केवळ गांधींच्या सहचारिणी नव्हत्या तर गांधींच्या अनेक निर्णयात त्यांची भुमिकाही महत्त्वाची ठरली आहे. त्यासंदर्भातील वर्णन लेखकाने त्यात अतिशय समर्पकपणे मांडले आहे.