शेवाळी ते नेत्रंग (गुजरात) दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 ची वाट बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 10:39 AM2017-12-02T10:39:38+5:302017-12-02T10:39:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेवाळी ते नेत्रंग (गुजरात) या दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 वरील रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आह़े तब्बल 10 मीटर असलेल्या या रस्त्याचे तूर्तास रूंदीकरण होणार आह़े तथापि तळोदा ते हातोडा या दोन गावांमधून जाणा:या वळणरस्त्यासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरूच झाली नसल्याने काम रखडण्याची चिन्हे आहेत़
शेवाळी-निजामपूर-छडवेल- नंदुरबार-तळोदा व तेथून अक्कलकुवा येथून नेत्रंग या 753 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला नुकतीच मंजूरी मिळाली आह़े राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती होती़ मात्र तूर्तास केवळ 10 मीटर रूंदीकरणाच्या कामांना नॅशनल हायवे अॅथारिटी ऑफ इंडियाने मान्यता दिली आह़े त्यानुसार छडवेल ते आष्टे या दरम्यान कामांना सुरूवात करण्यात आली आह़े राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रस्त्यासाठी निर्धारित असलेल्या नंदुरबार आणि तळोदा शहराजवळ प्रत्येकी एक असे दोन वळणरस्त्यांना मंजूरी देण्यात आली आह़े
रस्ताकामाचा ठेका मिळालेल्या खाजगी कंत्राटदारांकडून सव्रेक्षणाचे कामही सुरू आह़े या सव्रेक्षणाचे काम पूर्ण होण्यास अद्याप काहीकाळ अवधी आह़े यात नंदुरबार आणि तळोदा शहराबाहेरून जाणा:या दोन्ही वळणरस्त्यांसाठी अधिग्रहीत करण्यात येणा:या शेतक:यांच्या जमिनींची हस्तांतरण प्रक्रिया व मोबदला प्रक्रिया अद्यापही अपूर्ण असल्याने या दोन्ही वळणरस्त्यांचे काम दीड वर्षानंतर सुरू होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आह़े