नवापूर पालिकेच्या उपनगराध्यक्ष काँग्रेसचे बलेसरिया यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 12:44 PM2020-01-25T12:44:48+5:302020-01-25T12:45:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी आरीफभाई बलेसरिया यांची आज बहुमताने निवड झाली. १५ विरुध्द दोन अश्या फरकाने ...

Navapur: Municipality | नवापूर पालिकेच्या उपनगराध्यक्ष काँग्रेसचे बलेसरिया यांची निवड

नवापूर पालिकेच्या उपनगराध्यक्ष काँग्रेसचे बलेसरिया यांची निवड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी आरीफभाई बलेसरिया यांची आज बहुमताने निवड झाली. १५ विरुध्द दोन अश्या फरकाने त्यांची ही निवड झाली.
निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षातर्फे उप नगराध्यक्षपदासाठी आरीफभाई इब्राहीम बलेसरीया यांनी अर्ज सादर केला. अपक्ष म्हणुन मंगला विजय सैन यांनीही नामांकन अर्ज सादर केला. सकाळी ११ वाजता निवडणुक प्रक्रियेला पिठासीन अधिकारी नगराध्यक्षा हेमलता पाटील यांचा अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. दोन्ही नामनिर्देशन पत्र छाननीत वैध ठरविण्यात आले. कुणाचीही माघार न झाल्याने पिठासीन अधिकारी यांनी हात उंच करुन मतदान घेतले.
राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे उमेदवार आरीफभाई बलेसरीया यांच्या बाजुने १५ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार मंगला विजय सैन यांच्या बाजुने दोन मते मिळाली. आरीफभाई बलेसरीया यांना सर्वात जास्त मते मिळाल्याने पिठासीन अधिकारी नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी त्यांना विजयी घोषित केले.
उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेत चार नगरसेवक अनुपस्थित राहिले. दोन नगरसेवक जिल्हा नियोजन व विकास मंडळावर सदस्य आहेत. आज जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहिल्याने ते गैरहजर होते. अन्य दोन पैकी एक अपक्ष व कॉग्रेसचे एक असे दोन नगरसेवक निवड प्रक्रियेत नव्हते. त्या बाबतचा तपशिल उपलब्ध होउ शकला नाही.
निवडणुक कामात पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, कर निरीक्षक मनोज पाटील यांनी काम पाहीले.
नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील, मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे, गटनेता आशिष मावची, नरेंद्र नगराळे यांच्यासह सर्व नगरसेवक व पालिका कर्मचारी यांनी बलेसरिया यांचा गौरव केला.

Web Title: Navapur: Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.