नवापूर एस.टी. आगारात चालकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:05 PM2017-11-22T12:05:41+5:302017-11-22T12:05:52+5:30
ल कमत न्यूज नेटवर्कनवापूर : एस.टी. आगारात बस चालकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 40 वर्षावरील सर्व चालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.शिबिरात चालंकाची मधुमेह, सी.बी.सी., लिव्हर कार्यरत चाचणी, यकृत चाचणी, छातीचा एक्स रे, क्षयरोग या सर्व वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या. ठाणे व मुंबई येथील डॉ.सुशांत सपकाळ, डॉ.शशिकांत पाटील, डॉ.लक्ष्मी नारायन शहा यांनी आरोग्य तपासणी केली. आगार प्रमुख राजेंद्र अहिरे, योगेश शिवदे, व्ही.एस. गावीत, व्ही.एम. गावीत, कामगार सेनेचे एस.बी. अहिरे, आर.बी. ठाकरे, संजय शिंदे, भावीन पाटील, व्ही.एस. वळवी आदी उपस्थित होते. आगार प्रमुख अहिरे यांनी प्रवाशांना सुरक्षीत व निर्भय सेवा देणे शक्य होईल यासाठी सर्व चालकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून शिबिर आयोजित करण्यात आले. चालकांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. चालक व वाहकांनी नेहमी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन एस.बी. अहिरे यांनी तर आभार संजय शिंदे यांनी मानले.