सातपुडय़ात युवांकडून वनांना ‘नवसंजीवनी’

By Admin | Published: July 13, 2017 01:36 PM2017-07-13T13:36:45+5:302017-07-13T13:36:45+5:30

गेल्या तीन वर्षात हरणखुरी वनक्षेत्रात तब्बल 10 हजार वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन करण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला आह़े

'Navsanjivi' to the forests of Satpudi | सातपुडय़ात युवांकडून वनांना ‘नवसंजीवनी’

सातपुडय़ात युवांकडून वनांना ‘नवसंजीवनी’

googlenewsNext
लाईन लोकमतधडगाव, जि. नंदुरबार, दि. 13 - सातपुडय़ातील वनांना नवसंजीवनी देण्यासाठी हरणखुरी ता़ धडगाव येथील युवक-युवतींनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात पुढाकार घेतला होता़ यातून गेल्या तीन वर्षात हरणखुरी वनक्षेत्रात तब्बल 10 हजार वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन करण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला आह़े येथील ज्येष्ठांनी युवकांमध्ये निसर्गाप्रति आपलेपणाची भावना जागी केल्याने वन समृद्धी पुन्हा बहरत आह़े धडगावपासून हाकेच्या अंतरावर दीड हजार लोकवस्तीच हरणखुरी गाव आह़े बारीपाडा, पाटीलपाडा, बांदरपाडा, मधलापाडा आणि हरणखुरी यांचा समावेश असलेल्या गावाच्या लगत मोठे वनक्षेत्र आह़े सातपुडय़ात केवळ हरणखुरीच्या वनांमध्ये आढळणारे मोर ही या परिसराची खरी ओळख आह़े ही ओळख आणखी दृढ होऊन वनक्षेत्र अधिक समृद्ध व्हावे, यासाठी काही वर्षापूर्वी हरणखुरी गावातील ग्रामस्थांच्या पुढाकाराने वनसंजीवनी संयुक्त वनसमितीची स्थापना करण्यात आली होती़ दरवर्षी काही झाडे लावणे, गुरेचराईला बंदी, कु:हाड बंदी, वनौषधी टिकवून ठेवणे, यासह विविध उपक्रम राबवण्यावर त्यांच्याकडून भर देण्यात येत होता़ हे सर्व उपक्रम सुरू असतानाही येत्या काळात या वनांचे भवितव्य काय, असा प्रश्न समितीसमोर उभा राहत होता़ यावर चारही पाडे आणि हरणखुरी गावातील नागरिकांनी एकत्र येऊन युवकांना या उपक्रमात समाविष्ट करण्याचा अनोखा प्रयोग तीन वर्षापूर्वी सुरू केला़ गावातील ज्येष्ठ असलेले पोलीस पाटील उग्रावण्या पावरा, ग्रामपंचायत सदस्य बी़क़ेपावरा, मोचडा पावरा यांनी युवक आणि युवतींचा समितीत समावेश करून घेतला़ यातून गेल्या तीन वर्षात वन संगोपनाची एक नवीन चळवळ धडगाव तालुक्यात निर्माण झाली आह़े केवळ रोपांची लागवड न करता, त्यांचे संगोपन आणि वनांचे महत्त्व पटवून देण्याचा उपक्रम या युवक-युवतींनी घेतला आह़े यंदा समितीच्या युवा सदस्यांनी शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवडअंतर्गत हरणखुरी गावाच्या लगत असलेल्या डोंगरावर एक हजार झाडे ही श्रमदानातून रोवली आहेत़

Web Title: 'Navsanjivi' to the forests of Satpudi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.