नवापुर नगरपालिकेचा पोटनिवडणूक कार्यक्रम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:23 PM2019-12-05T12:23:46+5:302019-12-05T12:23:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : नगरपालिकेच्या पोट निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यांतर्गत निवडणुक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी सायबर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : नगरपालिकेच्या पोट निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यांतर्गत निवडणुक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी सायबर कॅफे चालक व विविध पक्षांचे पदाधिकारी यांना निवडणूक कामकाजाची माहिती देत आचारसंहिता पालनाबाबत मार्गदर्शन केले.
पालिकेच्या प्रभाग क्रमांक ६ (अ) व ७ (अ) ची पोटनिवडणुक जाहीर झाली असून निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून सुनियोजित पद्धतीने तयारीस सुरुवात करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी सायबर कॅफे व विविध पक्षांचे पदाधिकाऱ्यांना कामकाजाची माहिती देत आदर्श आचारसंहितेचे पालन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. पालिका कार्यालयाच्या ही बैठक सभागृहात झाली. नायब तहसिलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, राष्ट्रवादीचे पालिका गटनेते नरेंद्र नगराळे, आपचे डॉ. सुनिल गावीत, नगरसेवक आशीष मावची, कार्यालय अधिक्षक अनिल सोनार, मिलिंद भामरे, मनोज पाटील, अशोक साबळे आदी उपस्थित होते. ४ ते १२ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन भरणे, १३ रोजी छाननी, १८ रोजी माघार, २० रोजी उमेदवारांची यादी व २९ रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या दरमयन मतदान होणार आहे़ ३० रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी होणार आहे़ दरम्यान पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नव्हता़