रापापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:58 PM2018-03-18T12:58:33+5:302018-03-18T12:58:33+5:30
ग्रामस्थांची मागणी : आरोग्य सुविधेअभावी रुग्णांचे होताय हाल
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 18 : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्यालगत असलेल्या रापापूर गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आह़े या ठिकाणी आरोग्याच्या सेवासुविधांकडे लक्ष देण्याची गरज आह़े
प्राथमिक आरोग्य केंद्राची वारंवार मागणी करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े
दरम्यान, रापापूर गावाच्या सातपुडा पर्वतरांगेत माळखुर्द, चिरमाळ, कुलीडाबर, पालाबारी ही गावे असून या गावांसमोर आरोग्याची समस्या निर्माण झाली आह़े या ठिकाणी ब:यापैकी लोकवस्ती आह़े त्यामुळे त्यानुसार आरोग्य सुविधाही आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आह़े
संबंधित गावातील एखादी ग्रामस्थ आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी कोठे न्यावे? असा प्रश्न येथील ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत असतो़ अशा स्थितीत रुग्णाचे आरोग्य अधिकच ढासळत असत़े रुग्ण आजारी पडल्यास येथील ग्रामस्थांना वाल्हेरी तसेच प्रतापपूर या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांना जावे लागत असत़े
परंतु वाहनाची व्यवस्था नसल्याने तेही अवघड होऊन बसत़े अशा स्थितीत काय करावे काहीच समजत नाही़ त्यामुळे आपआपल्या गावाहून पायी चालतच रापापूर गाठून तेथून सरळ तळोदा रुग्णालयात यावे लागत असत़े परंतु त्या दरम्यान रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत असतो़