बंद पडलेले पथदिवे सुरू करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:33 AM2021-09-27T04:33:16+5:302021-09-27T04:33:16+5:30
दुर्गम भागातील रस्ते व पूल दुरुस्तीची मागणी धडगाव : यंदाच्या पावसाळ्यात धडगाव तालुक्याच्या दुर्गम व अति दुर्गम भागात पावसामुळे ...
दुर्गम भागातील रस्ते व पूल दुरुस्तीची मागणी
धडगाव : यंदाच्या पावसाळ्यात धडगाव तालुक्याच्या दुर्गम व अति दुर्गम भागात पावसामुळे रस्ते व पूल तुटल्याचे प्रकार घडले आहेत. यातून त्या-त्या गाव पाड्यांवर वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. याकडे जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोन्ही यंत्रणांनी पूरहानी कार्यक्रमांतर्गत रस्ते व पूल निर्मिती करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री पुन्हा वाढली
नंदुरबार : कोरोनाकाळात पोलीस प्रशासन व अन्न औषध प्रशासन विभाग यांच्याकडून अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती. यातून ही विक्री गेल्या काही काळापासून बंद होती; परंतु गत काही दिवसांपासून जिल्ह्यात गुटखा विक्री पुन्हा सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे. अवैधपणे हा गुटखा विक्रीसाठी गुजरात राज्यातून नंदुरबार जिल्ह्यात आणला जात असल्याचे समोर आले आहे.
खासगी वाहनांमधून ‘डिस्टन्सिंग’ गायब
नंदुरबार : कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याच्या सूचना शासनाच्या आहेत; परंतु काही ठिकाणी या बाबींचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातून धावणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांमध्ये दाटीवाटीने प्रवाशांना बसवले जात असल्याने नियमांचा भंग होत आहे.