लोणखेडा येथील गोमाईवरील नवीन पूल पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:43 PM2017-11-26T12:43:25+5:302017-11-26T12:43:39+5:30

New bridge over Gomaii at Lonkheda Completed | लोणखेडा येथील गोमाईवरील नवीन पूल पूर्णत्वाकडे

लोणखेडा येथील गोमाईवरील नवीन पूल पूर्णत्वाकडे

Next
कमत न्यूज नेटवर्कशहादा : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशची नाळ जोडणारा लोणखेडा येथील गोमाई नदीवरील नवा पूल पूर्णत्वाकडे आला असून, आता हा पूल रहदारीसाठी केव्हा सुरू होईल याची सर्वाना प्रतिक्षा लागली आहे.शहाद्यापासून अवघ्या 17 ते 18 किलोमीटर अंतरावर असणा:या मध्यप्रदेशला महाराष्ट्राशी जोडणारा एक नवीन पूल लोणखेडा येथे गोमाई नदीवर बाधला जात आहे. मध्यप्रदेश, सुतगिरणी, पर्यटनक्षेत्र असलेले उनपदेव आणि तोरणमाळ यांना शहाद्याशी जोडणारा हा पूल आहे. येथे एक जुना पूलही आहे. मात्र या पुलावर रहदारी वाढल्याने नवीन पूल बांधण्यात येत आहे. या पुलाचे काम पूर्णत्वाकडे आले असले तरी अजून काही अंतिम कामे बाकी असल्याने पूल सुरु होण्यास काही कालावधी लागणार आहे. गोमाई नदीवर सध्या जुना पूल सुरू आहे. या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि वाहनांची एकच गर्दी होत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन पूल तत्काळ सुरू होण्याकडे लक्ष लागले आहे.या पुलाच्या कठडय़ांचे काम पूर्ण झाले असून, कठडय़ांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. सुमारे 158 मिटर लांबीच्या या पुलास नागरिकांसाठी एका बाजूने पायी चालण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना या पुलाची प्रतिक्षा असल्याने पूल केव्हा सुरू होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: New bridge over Gomaii at Lonkheda Completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.