एचआयव्ही ग्रस्तांना आशेचा नवा किरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 01:00 PM2019-12-01T13:00:10+5:302019-12-01T13:00:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एचआयव्ही व एड्स बांधितांच्या मुळ समस्या लक्षात न घेता एरवी त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एचआयव्ही व एड्स बांधितांच्या मुळ समस्या लक्षात न घेता एरवी त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते, त्यामुळे या आजाराने बाधितांना सकारात्मक जीवन जगता येत नाही. त्यांनाही समाजात वावरता यावे, यासाठी शासनामार्फत जिल्ह्यात विहान व लक्ष्यगट हस्तक्षेप हे दोन प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. हे प्रकल्प दोन वेगवेगळ्या संस्थांना दिले असून या संस्था बाधितांमध्ये जगण्याचे आत्मबल वाढवत आहे.
चेन्नईच्या वेश्यावस्तित 1086 मध्ये एड्सचा रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण देशात त्याचे लोण पसरले. त्यात नंदुरबार जिल्हा देखील सुटला नसून अनेकांना एचआयव्हीची लागण झाली आहे. संपूर्ण देशासह जिल्ह्यात देखील या आजाराने गंभीर रुप घेतल्यामुळे शासनामार्फत विहान व लक्ष्यगट हस्तक्षेप हे दोन प्रकल्प सुरु करण्यात आले. या आजाराने बाधित असले तरी त्यांचवर त्या-त्या कुटुंबियांची पर्यायाने समाजाचीच मोठी जबाबदारी पडली आहे. त्यांच्या वारसदारांनाही अन्य लोकांच्या वारसदारांप्रमाणे कौटुंबिक आधार मिळावा, यासाठी हे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकल्पांतर्गत बाधितांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांना त्यांना लाभ मिळवून दिला जात आहे. या योजनांची माहिती देत त्यांच्यावर समुपदेशन करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात नवनिर्माण सर्व समाज हितार्थ व नेटवर्क ऑफ बायपिपल लिव्हींग विथ एचआयव्ही या दोन वेगवेगळ्या संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर एचआयव्ही व एड्स बाधितांच्या संपूर्ण जबाबदा:या सोबविण्यात आल्या आहे.
या संस्थांमार्फत बाधितांना घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान, बसप्रवासासाठी कायमस्वरुपी मोफत पास मिळवून देण्यात येत आहे. दोन्ही संस्थांमार्फत बाधितांवर समुपदेशन करीत शासनाया सर्व योजनांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
या संस्थांच्या माध्यमातून आजाराने पीडित व्यक्तींना देखील समाजात सामान्यांप्रमाणे वावरता येत आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबियांना आपला काय आधार आहे, याची जाणीव करुन देत जीवन जगण्याचे त्यांच्यात आत्मबळ देखील निर्माण करण्याचा प्रय} करण्यात येत आहे.
बाधितांना सहजीवनाचाही आधार
एचआयव्हीसह जीवन जगणा:या स्त्री-पुरुषांना समाजात इतरांप्रमाणे वावरता यावे, लोकांच्या मनातून या आजाराचे भय जावे याकरिता पोलीस सेवेत काम करत असताना कर्तव्याचे भान ठेवत शडायाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलीक सपकाळे यांनी सामाजिक संघटनांचा सहभाग या उपक्रमात करुन घेतला आह़े यातून ब:याच गोष्टींबाबतच्या अडचणी दूर झाल्या़ यात प्रामुख्याने वधूवरांना लागणारे साहित्य हे सामाजिक संस्थेकडून उपलब्ध करुन देण्यात येत़े मंगळसूत्र आणि भोजनाच्या व्यवस्थेसह इतर महत्त्वपूर्ण गोष्टी ह्या लोकसहभागातून उपलब्ध करुन देण्यात येतात़ यातून सहभाग देणा:यांमध्ये एचआयव्हीबाबतची भितीही दूर होत़े या विवाह सोहळ्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला बोलावण्याचा प्रयत्न केला आह़े यंदा शहाद्यात होणा:या एचआव्ही ग्रस्तांच्या विवाह सोहळ्यात काही जोडप्यांचा विवाह लावण्यात येणार आहे. त्यात नेटवर्क ऑफ बायपिपल लिव्हींग विथ एचआयव्ही या संस्थेमार्फत दोन जोडप्यांची नोंदणी करण्यात आली आहे.