नवीन वर्षाची सुरुवात शैक्षणिक दृष्टय़ा शुभशकुनाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:33 PM2019-01-18T18:33:30+5:302019-01-18T18:33:38+5:30

-मनोज शेलार नवीन वर्षाची सुरुवात नंदुरबार जिल्हावासीयांच्या दृष्टीने शुभशकुनच म्हणावी लागेल. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवडय़ात राज्य शासनाने नंदुरबारचे बहुप्रतिक्षीत ...

New Year Begins with an Educational View of Goodwill | नवीन वर्षाची सुरुवात शैक्षणिक दृष्टय़ा शुभशकुनाची

नवीन वर्षाची सुरुवात शैक्षणिक दृष्टय़ा शुभशकुनाची

Next

-मनोज शेलार
नवीन वर्षाची सुरुवात नंदुरबार जिल्हावासीयांच्या दृष्टीने शुभशकुनच म्हणावी लागेल. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवडय़ात राज्य शासनाने नंदुरबारचे बहुप्रतिक्षीत वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून कार्यवाहीला सुरुवात केली. लगोलग दुस:या आठवडय़ात राज्य शासनाने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात रुसा अंतर्गत मॉडेल डिग्री कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतला. आधीच नंदुरबारात आंतरराष्ट्रीय शाळा सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आदिवासी संस्कृती व संवर्धन केंद्र मंजुर आहे. कृषी महाविद्यालय सुरू झालेले आहे. आकांक्षीत जिल्ह्याअंतर्गत आणखी काही शैक्षणिक सुविधा नंदुरबारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक सुविधांसंदर्भात नंदुरबार आता विकसीत होऊ लागले असून हा वेग असाच कायम राहील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
राज्यात व एकुणच देशात नंदुरबारची ओळख आदिवासी, मागास जिल्हा म्हणून आहे. एकत्रीत धुळे जिल्हा असतांना या भागाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. सर्वच बाबतीत नंदुरबार ‘मागासलेपण’ जपून होता. परंतु जिल्हानिर्मिती झाली आणि या भागाचे भाग्य उजळण्यास सुरुवात झाली. गेल्या 20 वर्षात नंदुरबारची प्रगती धिम्या गतीने का न होवो सुरू आहे. त्यातल्या त्यात शिक्षणाबाबतीत ब:यापैकी सुविधा उपलब्ध होऊ लागल्याने दुर्लक्षीत असलेला हा भाग आता मुख्य प्रवाहात आला आहे.
नवीन वर्षात नंदुरबारकरांसाठी शिक्षणाच्या दृष्टीने दोन मोठे निर्णय झाले. पहिला होता वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीचा. अनेक वर्षापासूनचे स्वप्न आता साकार होण्याची शक्यता या निमित्ताने निर्माण झाली आहे. दुसरा निर्णय झाला तो मॉडेल कॉलेज मंजुरीचा. देशात 70 ठिकाणी आणि राज्यात केवळ दोनच ठिकाणी असे मॉडेल कॉलेज सुरू होणार आहेत. त्यात नंदुरबारचा समावेश आहे. राष्ट्रीय उच्चस्तर अभियानाअंतर्गत केंद्र शासनाने या महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे. राज्य सरकारचा देखील यात खर्चाच्या दृष्टीने 40 टक्के वाटा राहणार असल्यामुळे राज्य मंत्रीमंडळाची देखील त्याला मंजुरी मिळणे आवश्यक होते. परवाच्या मंत्रीमंडळ बैठकीत त्याला मंजुरी मिळाली आणि या महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला. मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह डिजीटल क्लासरूम, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि शैक्षणिक विभाग राहणार आहेत. पसंती आधारीत श्रेयांकन अभ्यासक्रम, मुलभूत आणि कौशल्याधारीत ऐच्छिक अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. त्यामुळे नंदुरबारसारख्या भागातील विद्याथ्र्यासाठी ते मोठे सोयीचे ठरणार आहे. आता जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून देवून या महाविद्यालयाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात कशी होईल या दृष्टीने प्रय}शील राहणे गरजेचे ठरणार आहे.
नंदुरबारात यापूर्वीच राज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय निवासी शाळा सुरू करण्यात आली आहे. दोन वर्षापासून ही शाळा येथे सुरू आहे. याशिवाय कृषी महाविद्यालय चार वर्षापासून सुरू झालेले आहे. विद्यापीठाने आदिवासी संस्कृती संवर्धन व जतन केंद्राला मंजुरी दिलेली आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जागाही उपलब्ध करून दिलेली असून त्याचे काम मात्र पुढे सरकू शकले नसल्याचे चित्र आहे. आदिवासी विकास विभागाची इंग्रजी माध्यमाची एकलव्य निवासी पब्लिक स्कूल देखील सुरू आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय दहा वर्षापासून सुरू आहे. केंद्र शासनाच्या योजनेतील आकांक्षीत जिल्हा म्हणून आणखी काही कौशल्याअधारीत शैक्षणिक सुविधा येथे येत्या काळात येथे मंजुर होण्याची शक्यता आहे.
एकुणच गेल्या काही वर्षात शैक्षणिक हबच्या दृष्टीने नंदुरबार आगेकूच करीत आहे. परंतु शासनाने केवळ घोषणा करून, मंजुरी देवून न थांबता अशी कॉलेजेस्, शैक्षणिक सुविधा लागलीच कशा सुरु होतील याबाबतही तेवढेच प्रय} करणे गरजेचे आहे. तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, आंतरराष्ट्रीय शाळा यामधील सोयी-सुविधा, मणुष्यबळ यांचा विचार करता ‘आलबेल’ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शैक्षणिक केंद्रांची मंजुरी देतांना त्यांचा दर्जा, गुणवत्ता आणि आवश्यक सोयी सुविधा पुढील कालावधीत सहज आणि मागणीप्रमाणे उपलब्ध होतील यादृष्टीनेही आधीच नियोजन करून ठेवणे सोयीचे ठरणार आहे.
 

Web Title: New Year Begins with an Educational View of Goodwill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.