नवापूरात संतप्त शेतक:यांनी ठोकले वीज कार्यालयाला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:34 PM2018-10-04T12:34:36+5:302018-10-04T12:34:41+5:30
कृषी पंपांना अनियमित वीज पुरवठा : अन्यथा औद्योगिक फिडर बंद पाडण्याचा इशारा
नवापूर : कृषी फिडरवरुन अल्प दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्याने हातातील पिकांचे नुकसान होत आहे. निवेदन देण्यासाठी येणार असल्याची पूर्वसुचना देवूनही संबंधीत अधिकारी नसल्याचे पाहुन शेतक:यांनी कर्मचा:यांना बाहेर काढून विज कंपनी कार्यालयाला टाळे ठोकले. दुपारी ही घटना घडली. भरत गावीत यांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले.
तालुक्यातील बहुतांश भागात कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे शेतकरी हताश झाला आहे. उभे पिक हातातुन जात असल्याचे पाहण्याशिवाय शेतक:याकडे विकल्प नसल्याने गावा गावातील शेतकरी एकत्र आले. सहाय्यक विज अभियंता के.टी. ठाकरे यांना दोन दिवसा पुर्वी शेतक:यांनी नवापूर तालुक्यातील शेती पंपाचे सर्व फिडर वरुन कमी दाबाचा व अनियमित वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावे यासाठी निवेदन देण्यासाठी येणार असल्याची पूर्वसूचना दिली होती. सावरट, नवागाव, खेकडा, रायपूर, कोळदा, वडखुट, उकाळापाणी, मोग्राणी, हळदाणी, बिलबारा, डोकारे वासदा व बंधारे आदी गावातील शेतकरी नवापूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात दाखल झाले. मात्र के.टी.ठाकरे हे रजेवर गेल्याचे सांगण्यात आले. त्याठिकाणी इतर कोणीही जवाबदार अधिकारी नसल्याचे पाहुन शेतकरी संतप्त झाले. त्यांनी विज कार्यालयातील कर्मचारी यांना बाहेर काढले व सर्व कार्यालयाच्या खोलींना कुलुप लाऊन नंतर प्रवेश व्दाराला कुलुप ठोकले.
संतप्त शेतक:यांनी घोषणाबाजी करत जो पयर्ंत कुणी जवाबदार अधिकारी येत नाही तो पयर्ंत आम्ही विज कार्यालयात कोणाला जाऊ देणार नाही अशी भुमिका घेतली. दुपारी दोन वाजता खांडबारा विज कार्यालयाचे अभियंता एस.एम.चव्हाण नवापूर येथे दाखल झाले. नवापूर तालुका कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष भरत गावीत यांनी मध्यस्थी करुन शेतक:यांना शांत करुन अभियंता चव्हाण यांना निवेदन चर्चा केली.
निवेदनात म्हटले आहे की, नवापूर तालुक्यातील शेतक:यांच्या शेती पंपासाठी विज पुरवठा होत असलेले सावरट, नवागाव, खेकडा, रायपूर, कोळदा, वडखुट, उकाळापाणी, मोग्राणी, हळदाणी, बिलबारा, डोकारे वासदा व बंधारे येथील फिडरवरुन गेल्या दीड महिन्यापासून शेती पंपास अत्यंत कमी दाबाचा व अनियमित तथा लपंडावाने विज पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतक:यांना वेगवेगळया पिकांना पाणी देता येत नाही. आठ तास वीज राहते. त्याचवेळी या समस्या येत असल्यामुळे शेतक:याचे शेती पंप चालत नाहीत.
शेतक:यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुनही विज पुरवठयात कुठलीही सुधारणा झालेली नाही. शेती पंपासाठी असलेला विज पुरवठा ताबडतोब सुरळीत करुन त्यात सुधारणा करण्यात यावी अन्यथा नवापूर तालुक्यातील शेतकरी आंदोलन करुन 24 तास इंडस्ट्रीयल वापरासाठी होत असलेल्या विज पुरवठ्याचे फिडर बंद पाडण्याचा निर्णय घेतील. असा इशारा देण्यात आला.
निवेदनावर पंचायत समिती उपसभापती दिलीप गावीत, पंचायत समिती सदस्य जालमसिंग गावीत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवलसिंग गावीत, दिनकर मावची, अमृत पाडवी, संजय वसावे, राहुल नाईक, प्रफुल नाईक, शंकर गावीत, दिलीप कोकणी, विवेक गावीत, विरसिंग कोकणी, नरेश वसावे, राजेश वसावे, सुनिल वसावे, मिलिंद वसावे, जगन वळवी, फत्तेसिंग वसावे, दिलीप वसावे, सुबन कोकणी, भिमसिंग गावीत, शेगा मावची, प्रकाश नाईक, संजु वसावे, अभसिंग वसावे, सुरेश गावीत यांच्यासह असंख्य शेतक:यांच्या सह्या आहेत. सहायक पोलिस निरीक्षक दिपक पाटील, उपनिरीक्षक संदिप पाटील, हवालदार निजाम पाडवी, योगेश थोरात, मोहन साळवे आदीनी बंदोबस्त ठेवला होता.